बंद शाळा फोडून प्रवेश निर्गम रजिस्टरमध्ये खाडाखोड; ७० हून अधिक विद्यार्थ्यांच्या जात रकान्यापुढे लिहिले ‘कुणबी!’, गंगापूर तालुक्यातील पिंपरी येथील घटनेने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुणीतरी बंद शाळा फोडून मुख्याध्यापक कार्यालयात घुसत प्रवेश निर्गम रजिस्टमध्ये खाडाखोड केली. ७० हून अधिक विद्यार्थ्यांच्या नावापुढे कुणबी अशी नोंद केली आहे. ४ विद्यार्थ्यांच्या टीसीही फेरफारीच्या उद्देशाने चोरून नेल्या. मंगळवारी (११ नोव्‍हेंबर) या प्रकरणात मुख्याध्यापकाने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे.

या प्रकरणात प्रकाश हरीभाऊ नजन (वय ३९ रा. हॉटेल सह्याद्रीमागे लासूर रोड, गंगापूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पिंपरी (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जून २०२३ पासून कार्यरत आहेत. शाळा चौथीपर्यंत असून, दोन वर्ग खोल्या आहेत. १६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान शाळेला दिवाळीची सुटी होती. १५ ऑक्टोबरला दुपारी ४ च्या सुमारास दोन्ही वर्ग खोल्यांना कुलूप लावले होते. ३ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शाळेचे गेट उघडले असता शाळेतील वर्ग खोलीचे ऑफिसचे लॉक उघडे असल्याचे दिसले. त्यानंतर त्याच दिवशी गावातील बरेच व्यक्ती प्रवेश निर्गमचा उतारा घेण्यासाठी आल्याने प्रकाश नजन हे ऑफिसमधील कपाटाकडे गेले असता कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले.

कपाटाच्या आतील कप्प्यातील प्रवेश निर्गम रजिस्टरची पाहणी केली रजिस्टर क्र. १ व रजिस्टर क्र. २ मध्ये विद्यार्थ्यांच्या कॉलममधील जात या रकान्यात कोणीतरी खाडाखोड करून कुणबी असे लिहिल्याचे आढळले. प्रवेश निर्गम उतारा फाईलमधील दुय्यम प्रती कुणीतरी चोरून नेल्याचे आढळले. टीसी बुकमधील ४ विद्यार्थ्यांच्या स्थळ दाखला प्रतीही फेरफार करण्याच्या उद्देशाने चोरून नेल्याचे समोर आले. विद्यार्थी प्रवेश निर्गम रजिस्टर क्र. १ व २ मध्ये ७० हून अधिक विद्यार्थ्यांच्या नावासमोरील जात रकान्यात खाडाखोड, ओव्हरराइट करून कुणबी असे लिहिल्याचे आढळले. घटनेबाबत नजन यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पत्रव्यवहार करून कळवले. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने नजन यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर म्हस्के करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software