३ मित्र नेहमीप्रमाणे नदीत पोहायला गेले, अचानक वाहून जाऊ लागल्याने ग्रामस्थांचे बचाव कार्य, एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश, वैजापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राहेगाव (ता. वैजापूर) येथील ढेकू नदीत पोहताना तीन मित्र वाहून जाऊ लागले. पैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. दोघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ही घटना शनिवारी (४ ऑक्‍टोबर) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

अजय पांडुरंग बोरकर (वय २३, रा. राहेगाव) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. अक्षय बाळू शेलार (वय २५) व ओम सतीश बोरकर (वय २०, दोघे रा. राहेगाव) बचावले आहेत. तिन्ही मित्र ३ दिवसांपासून रोज पोहण्यासाठी जात होते. शनिवारीही सकाळी ८:३० ला नदीत उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण वाहून जाऊ लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने ग्रामस्थांनी नदीत उड्या घेत अक्षय व ओम यांना काही अंतरावर वाचविले.

मात्र उपसरपंच पांडुरंग बोरकर यांचा मुलगा अजय वाहून गेला. एकनाथ म्हस्के, रमेश शेजूळ, उमेश शेलार, बळीराम म्हस्के, रामनाथ शेलार, मनोज म्हस्के यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अजयच्या पश्चात आई, वडील, एक लहान बहीण असा परिवार आहे. अजय मिळून येत नसल्याने ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ११:३५ वाजता अजयचा मृतदेह नदीतून शोधून काढला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...

Latest News

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले... माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software