सोयगाव शहराला पिवळसर, शेवाळयुक्‍त पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : वेताळवाडी धरणातून सोयगाव शहराला मंगळवारी (२ जुलै) पिवळसर रंगाचा दूषित व शेवाळयुक्त पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू असून, याकडे नगरपंचायत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराला वेताळवाडी धरणातून साठवण टाकीद्वारे पाणी पुरवठा होतो. मात्र मंगळवारी थेट धरणातून नळाद्वारे […]

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : वेताळवाडी धरणातून सोयगाव शहराला मंगळवारी (२ जुलै) पिवळसर रंगाचा दूषित व शेवाळयुक्त पाणीपुरवठा झाल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू असून, याकडे नगरपंचायत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहराला वेताळवाडी धरणातून साठवण टाकीद्वारे पाणी पुरवठा होतो. मात्र मंगळवारी थेट धरणातून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील घराघरात शेवाळयुक्त व पिवळसर रंगाचा दूषित पाणी पुरवठा झाला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने नागरिकांनी वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला आहे. त्यामुळे शहर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शहरात काही भागांत दहा दिवसांच्या आड तर काही भागांना पाच दिवसांआड पिण्याच्या पाणीपुरवठा होतो. धरणात मुबलक पाण्याचा साठा असूनही नगर पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरात झालेल्या पिवळसर आणि शेवाळ युक्त पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुरवठा झालेल्या पाण्याचे नमुने तालुका आरोग्य विभागाने तपासणीसाठी घ्यावे व शहरात पिण्यायोग्य पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहर वासीयांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software