- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूरमध्ये खळबळ… बारावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रियकराचा बलात्कार; घरी खोटे सांगून दोघे वैजापूरहून पु...
वैजापूरमध्ये खळबळ… बारावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रियकराचा बलात्कार; घरी खोटे सांगून दोघे वैजापूरहून पुण्याला गेले होते…
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर दोघे वैजापूरहून पुण्याला गेले. तिथे एका लॉजवर त्याने तिच्यावर बलात्कार केला. शरीरसंबंधाची छायाचित्रे त्याने मोबाइलमध्ये काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने मुलीने कुटुंबीयांसह वैजापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा प्रियकर विजय साईनाथ राऊत, प्रियकराचा काका सुरेश साहेबराव राऊत (दोघे रा. […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर दोघे वैजापूरहून पुण्याला गेले. तिथे एका लॉजवर त्याने तिच्यावर बलात्कार केला. शरीरसंबंधाची छायाचित्रे त्याने मोबाइलमध्ये काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने मुलीने कुटुंबीयांसह वैजापूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा प्रियकर विजय साईनाथ राऊत, प्रियकराचा काका सुरेश साहेबराव राऊत (दोघे रा. जरूळ, ता. वैजापूर) व मुलीची मैत्रीण प्रज्ञा चव्हाण (रा. वैजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलगी तालुक्यातील एका महाविद्यालयात बारावीत शिकते. पाच महिन्यांपूर्वी तिची ओळख विजयसोबत झाली. दोघे मोबाइलवर बोलू लागले. भेटीगाठी सुरू झाल्या. यादरम्यान त्याने तिच्यासोबत फोटो काढले होते. दोघांचे प्रेमसंबंध घरी कळल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला समजावून सांगितले. त्यानंतर तिने विजयसोबत बोलणे सोडले. तरीही विजय तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता. मुलीच्या आई-वडील व नातेवाइकांनी विजयला समजावून सांगितले होते. तरीही तो मुलीला तू माझ्यासोबत पळून चल, नाही तर तू ज्या मुलासोबत लग्न करशील त्याला मी मारून टाकीन, अशी धमकी देत होता.
चार महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने वैजापूर शहरातील स्टेशन रोडलगत ब्युटीपार्लरचा कोर्स लावला. तिच्याकडे मोबाइल नव्हता. ती महिनाभरापासून मैत्रिणीच्या मोबाइलवरून विजयशी बोलू लागली. मात्र भेटीगाठीत अडचण येत असल्याने विजय व तिच्या मैत्रिणीने पुण्याला जायचे नियोजन केले. विजय व मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मुलीने घरी खोटेच सांगितले, की पुणे येथे एका दिवसाचा ब्युटीपार्लरचा कोर्स आहे.
घरी आल्यावरही संवाद सुरू…
मुलगी विजयने घेऊन दिलेल्या मोबाइलवरून त्याच्याशी बोलत होती. ही बाब तिच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्याकडील मोबाइल ताब्यात घेतला. तिला मामाच्या घरी पाठविले. त्यानंतर विजय व त्याचा काका सुरेशने तिच्या मामाला कॉल करून मुलीचे फोटो व्हायरल करू, तिला पळवून घेऊन जाऊ, असे धमकावले. त्यामुळे मुलीसह पालकांनी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास केला जात आहे.

