- News
- जिल्हा न्यूज
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात, छ. संभाजीनगर- सिल्लोड रोडवरील अवजड वाहतुकीत बदल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात, छ. संभाजीनगर- सिल्लोड रोडवरील अवजड वाहतुकीत बदल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (२ ऑगस्ट) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा : दुपारी १२ वा ४५ मि.नी शासकीय विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सिल्लोडकडे रवाना. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री : महिला सशक्तिकरण अभियान आणि मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमास […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (२ ऑगस्ट) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा : दुपारी १२ वा ४५ मि.नी शासकीय विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सिल्लोडकडे रवाना. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री : महिला सशक्तिकरण अभियान आणि मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर), दुपारी साडेतीन वा. मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ४ वा. १५ मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
सिल्लोडला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार असल्याने शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत. वाहतुकीतील बदल असे : छत्रपती संभाजीनगर ते जळगावकडे जाणारी जड वाहने छत्रपती संभाजीनगर – भोकरदन – अन्वा – शिवना – अंजिठामार्गे जळगावकडे जातील. जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक करणारी वाहने जळगाव- अंजिठा- शिवना-अन्वा – भोकरदन-हसनाबाद- पाल फाटा- फुलंब्रीमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

