झेंड्याच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्‍यू, कन्‍नडची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी चापानेर (ता. कन्‍नड) येथील झेंड्याच्या कठड्याला धडकून तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अशोक रामहरी खेडकर (वय ३४, रा. आंबा, ता. कन्नड) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो औराळ्याहून कन्नडकडे जात होता. चापानेर येथे रोडच्या मधोमध झेंड्याचा कठडा आहे. त्‍याला धडकल्यानंतर अशोकला […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी चापानेर (ता. कन्‍नड) येथील झेंड्याच्या कठड्याला धडकून तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अशोक रामहरी खेडकर (वय ३४, रा. आंबा, ता. कन्नड) असे मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो औराळ्याहून कन्नडकडे जात होता.

चापानेर येथे रोडच्या मधोमध झेंड्याचा कठडा आहे. त्‍याला धडकल्यानंतर अशोकला गंभीर जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्‍याचा मृत्‍यू झाला. कन्‍नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब धनुरे अधिक तपास करत आहेत. चापानेर येथील या चौकात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!

Latest News

सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!! सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव बोलेरो पिकअपने स्कुटीला दिलेल्या धडकेत स्कुटीस्वार डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सिल्लोड...
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software