छ. संभाजीनगरचे व्यावसायिक नरेंद्र सारडा यांचा सांजूळच्या धरणात बुडून मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : ६० वर्षीय व्यावसायिकाचा फुलंब्री तालुक्यातील सांजूळ धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास घडली. पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मृतदेह सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी अकराला अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून काढला. नरेंद्र परशुराम सारडा (रा. गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्या […]

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : ६० वर्षीय व्यावसायिकाचा फुलंब्री तालुक्यातील सांजूळ धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास घडली. पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मृतदेह सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी अकराला अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावातून काढला. नरेंद्र परशुराम सारडा (रा. गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्‍यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

व्यावसायिक प्रमोद वसंतराव जोशी (रा. सेवन हिल, छत्रपती संभाजीनगर) व नरेंद्र परशुराम सारडा हे दोघे मित्र सांजूळ येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी नरेंद्र सारडा यांना पोहण्याचा मोह झाला. त्यांनी कपडे काढून पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने व धरणात गाळ जास्त असल्याने ते गाळात अडकले. त्यांना बाहेर पडता येत नव्हते.

प्रमोद जोशी यांनी जवळच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. त्‍यामुळे त्‍यांनी सारडा यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाहीत. फुलंब्री पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सहाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

सायंकाळी सहापासून अग्निशमन दलाच्या जवानांनी सारडा यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही उपयोग झाला नाही. सोमवारी सकाळी सहापासून पुन्हा शोध सुरू केला असता सकाळी अकराला मृतदेह मिळून आला. फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी चारला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना

Latest News

ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने हद्दच केली. थेट ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये घुसून तिकीट काढायला आलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून चाकू...
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
हलगर्जीपणाचा कळस : अचानक नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी गायीसह गेला वाहून!; वैजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software