गंगापूर : कामगाराचा कंपनीत टँकमध्ये पडून मृत्‍यू; खुलताबाद : विवाहितेचा विहिरीत पडून मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भेंडाळा फाटा शिवारात ग्रेनॉज इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनी आहे. या कंपनीच्या वॉटर फिल्टरच्या टँकमध्ये पडून ऑपरेटरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समोर आली. निवास किशोर सवई (वय ३८, रा. भेंडाळा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. सवई हे कंपनीत वॉटर फिल्टर मशिनवर ऑपरेटर होते. मंगळवारी सायंकाळी सुमारास कंपनीत […]

गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भेंडाळा फाटा शिवारात ग्रेनॉज इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनी आहे. या कंपनीच्या वॉटर फिल्टरच्या टँकमध्ये पडून ऑपरेटरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समोर आली.

निवास किशोर सवई (वय ३८, रा. भेंडाळा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. सवई हे कंपनीत वॉटर फिल्टर मशिनवर ऑपरेटर होते. मंगळवारी सायंकाळी सुमारास कंपनीत आढळून न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता सवई वॉटर फिल्टरच्या टँकमध्ये तरंगताना आढळले. त्यानंतर तातडीने फिल्टर टँकमधून त्यांना काढून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू
खुलताबाद
: पाय घसरून विहिरीत पडल्याने पूजा भगवान काटकर (वय २१) या विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे मंगळवारी (२३ जुलै) दुपारी घडली. सकाळी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या शेतात पूजा इतर महिलांसोबत निंदणी करत होती. दुपारी १ वाजता पूजा पाणी आणण्यासाठी जवळील विहिरीवर गेली. पाणी शेंदताना पाय घसरून ती विहिरीत पडली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह बाहेर काढला. पूजाच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...

Latest News

विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला... विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गायरान जमिनीवर घर बांधणाऱ्या सरपंच महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी पदास अपात्र ठरवले. या कारवाईविरोधात सरपंचांनी विभागीय...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
सिल्लोडच्या या गावात सुरू होते सेक्स रॅकेट, पोलिसांनी छापा मारून युवतीची केली सुटका!
छत्रपती संभाजीनगरच्या तरुणींना महापालिका देणार पोलीस भरतीचे प्रशिक्षण, खासगी केंद्रचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला चांगला पर्याय
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software