सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जुनी पेन्शन योजना लागू करा यासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सोमवारी (११ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

राज्यातील १७ लाख कर्मचारी कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने केल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास जरारे यांनी सांगितले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात. रिक्त पदे अग्रक्रमाने भरावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी शासनासोबत चर्चा करून निवेदन दिले, परंतु शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही. शासनाने निर्णय न घेतल्यास सप्टेंबरमध्ये संप पुकारण्याचा इशारा इंदुमती थोरात, अनिल सूर्यवंशी, एस. बी. करपे, वैजनाथ विघोतेकर, रामेश्वर मोहिते, परेश खोसरे, सतीश भदाणे, ज्ञानेश्वर लोधे आदींनी दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...

Latest News

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर... बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
राखीने पोलीस जबाबात सांगितले, नक्की काय झाले, तेजाने गोळी का झाडली..., दहशत माजवणाऱ्या तेजाची पोलिसांनी शहरातून काढली दुसऱ्यांदा धिंड !
प्रवासी बसत असतानाच बस पुढे नेल्याने महिला पडली,चालकाला मारहाण, वाहतुकीचा खोळंबा, फुलंब्री तालुक्‍यातील आळंदमध्ये घडलं काय...
चंपा चौक- जालना रोड रस्‍त्‍याची मोजणी पूर्ण, २ आठवड्यांनी होईल मार्किंग, नंतर नोटिसा देऊन पाडापाडी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software