‘सिद्धार्थ’मध्ये घुमणार लवकरच सिंहाची डरकाळी!; विक्रम, रोहिणी-श्रावणी वाघ-वाघिणी जाणार कर्नाटकला...

On

‌छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिद्धार्थ उद्यानातील पांढरा वाघ विक्रम, पिवळ्या वाघिणी रोहिणी आणि श्रावणी या कर्नाटक येथील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला देऊन त्‍याबदल्यात २ सिंह, २ अस्वल व २ कोल्हे घेण्यात येणार आहेत. या एक्सचेंज प्रक्रियेला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. शिवमोग्गाच्या दोन अधिकाऱ्यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरला येऊन वाघांची पाहणी केली. आता पुढील आठवड्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक शिवमोग्गा येथे जाऊन सिंह, अस्वल, कोल्हे पाहून घेणार आहेत. त्‍यानंतर लगेचच प्राण्यांचे आदानप्रदान होईल.

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या १२ वाघ असून, ७ पिवळे तर ५ पांढरे वाघ आहेत. त्यांना ठेवण्यासाठी पिंजरे कमी पडत आहेत. शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाने वाघांची मागणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे केली होती. गेल्या महिन्यात प्राधिकरणाने मंजुरी दिली. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाने मोबदल्यात २ सिंह, २ अस्वल व २ कोल्हे मागितले, ते देण्याची तयारी शिवमोग्गाने दिली. सोबतच आणखीही काही प्राणी घेऊन जाण्याची ऑफर दिली आहे. शिवमोग्गाच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थमध्ये वाघांची पाहणी केली. सर्व प्राण्यांची योग्य निगराणी घेतली जात असल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. शिवमोग्गाचे प्राणिसंग्रहालय तब्बल ६०० एकरांत विस्तारलेले आहे. तिथे स्वतंत्र सफारी पार्कही आहे. १८ किंवा १९ ऑगस्ट रोजी महापालिकेचे पथक शिवमोग्गा येथे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...

Latest News

बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर... बाफना ज्वेलर्सचा राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
राखीने पोलीस जबाबात सांगितले, नक्की काय झाले, तेजाने गोळी का झाडली..., दहशत माजवणाऱ्या तेजाची पोलिसांनी शहरातून काढली दुसऱ्यांदा धिंड !
प्रवासी बसत असतानाच बस पुढे नेल्याने महिला पडली,चालकाला मारहाण, वाहतुकीचा खोळंबा, फुलंब्री तालुक्‍यातील आळंदमध्ये घडलं काय...
चंपा चौक- जालना रोड रस्‍त्‍याची मोजणी पूर्ण, २ आठवड्यांनी होईल मार्किंग, नंतर नोटिसा देऊन पाडापाडी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software