छत्रपती संभाजीनगर जिल्हा सैनिक कार्यालयात लिपिक-टंकलेखकांची भरती, माजी सैनिकांसाठी आहेत ७० जागा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) या पदांच्या एकूण ७२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिकांसह, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार युद्धकाळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत्यू झालेल्या किंवा अपंगत्व येऊन सेवेस अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एक पात्र व्यक्तीस, पसंतीक्रमानुसार निवड करण्यात येणार आहे.

७२ पदांपैकी ३ पदे किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असून, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्यांचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन (TCS-ION) यांच्या मार्फत राबविण्यात येणार असून, परीक्षेसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री मध्यरात्री २३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software