नव्या नियमात पुरुष परिचारिकांवर अन्याय, छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम २०२५ मध्ये ८०:२० लिंग विभाजक नियम लागू केला आहे. या विरोधात मेल नर्सेस बचाव समिती आक्रमक झाली असून, त्यांनी हा नियम पुरुष परिचारकांवर अन्यायकारक असल्याचे म्हणत सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) सकाळी क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा नियम रद्द करण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

राज्य समन्वयक सम्यक जमधडे, सचिन खंदारे, दुर्गादास शिंदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या नियमामुळे नर्सिंग व्यवसायात पात्र पुरुष उमेदवारांची संख्यात्मक संधी कमी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ८०:२० लिंग विभाजन नियम तत्काळ रद्द करावा. भरती केवळ शैक्षणिक गुणवत्ता व पात्रता आधारित, पुरुष नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांना सन्माननीय प्रतिनिधीत्वाची हमी देण्यात यावी, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, न्याय आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

मोर्चात यशोदीप जाधव, शंकर नाईकनवरे, रचना शिंदे, मिनल निर्मल, उत्कर्षा पटोले, सिकंदर पटेल, दीपक आहेर, श्रीधर जाधव, अमृता नवले, अक्षय कांबळे, गणेश बोढके, स्नेहल सोनवणे, राधा कराळे, शुभांगी मोरे, जयश्री जाधव, वंदना वसावे, शारदा डवले, पद्मावती वसावे, अंजली खरोडे, सुप्रिया माझळकर, ऋतुजा शिंदे, दीक्षा खरात, आकांक्षा हिवाळे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी

Latest News

हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software