छत्रपती संभाजीनगरात झाला ब्राह्मण महाकुंभ मेळावा!, ११ राज्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पहाडसिंगपुरातील जनेश्वर महादेव मंदिरात ११ राज्यांतील विविध भाषिक, प्रादेशिक व पोटशाखांतील ब्राह्मण पदाधिकाऱ्यांचा महाकुंभ मेळावा झाला. शनिवार आणि रविवार (२८ व २९ डिसेंबर) असा दोन दिवस मेळावा चालला. सर्व भेदाभेद बाजूला ठेवून ‘ब्राह्मणत्व' या व्यापक विचारधारेभोवती एकवटण्याचा निर्णय यावेळी झाला.

परशुराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, अ. भा. कान्यकुब्ज ब्राह्मण महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय शुक्ला, शिवओम मिश्रा, राष्ट्रीय महामंत्री महेश मिश्रा, अरुण शुक्ला, महंत सुधीरदास, पं. लोकेश दवे व महिला प्रकोष्टच्या डॉ. सीमा मिश्रा (तिवारी), ब्राह्मण समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद दामोदरे, विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर.बी. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोण काय म्हणाले...
-पोटशाखा, भाषावाद, प्रादेशिकता आणि संघटनात्मक अहंकार बाजूला ठेवून देशभरातील ब्राह्मणांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत पं. अजय शुल्का यांनी व्यक्त केले.
-वैचारिक ऐक्य साधले, तर समाज पुन्हामार्गदर्शक भूमिकेत येऊ शकतो यासाठी महाकुंभ आयोजित केल्याचे आयोजक विजया अवस्थी यांनी या वेळी सांगितले.
-शिक्षण, ज्ञान, संस्कार व सामाजिक जबाबदारी ही ब्राह्मण समाजाची मूळ ओळख आहे, असे मत अजय शुक्ला यांनी व्यक्त केले.

मेळाव्यात ब्राह्मणांसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मिलिंद दामोदरे, सीए आर. बी. शर्मा, राजेश बुटोले, धनंजय पांडे, सतीश मंडपे, अभिषेक कादी, रवींद्र करवंदे आदींचा समावेश होता. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजक सचिन अवस्थी, संजीव अवस्थी, दीपक पांडे, शशीमोहन अवस्थी यांच्यासह उत्तर देशीय ब्राह्मण सेवा समिती, ब्राह्मण समाज समन्वय समिती, अ. भा. कान्यकुब्ज ब्राह्मण महासभाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software