कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत : अभिनेत्री वनिता खरात; विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कलावंतांकडून बोलताना थोडासा शब्द जरी इकडे तिकडे झाला तर ट्रोल केले जाते. एका अर्थाने कलावंत हे सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना अधिक काळजी घ्यायला हवी, असे मत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांनी व्यक्‍त केले. सुंदरता दिसण्यावर अवलंबून नसते तर तुमच्या विचारातून, अभिनयातून आपण ती प्रकट करू शकता. त्यामुळे युवा कलावंतांनी अधिक प्रामाणिक व कष्ट करून स्वतःला सादर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्‌घाटन आज, २७ सप्टेंबरला सकाळी करताना अभिनेत्री वनिता खरात बोलत होत्या. विद्यापीठ परिसरात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. महोत्सवात चार जिल्ह्यांतून २६२ संघ आणि १ हजार २१ कलावंत सहभागी झाले आहेत. उद्‌घाटन सोहळा विद्यापीठ नाट्यगृहात झाला. कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. या वेळी विभागाचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक रावबा गजमल अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अ‍ॅड. दत्तात्रय भांगे, संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात वेळ, शिस्त व नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येईल, असे डॉ.कैलास अंभुरे यांनी सांगितले. प्रारंभी दोन्ही कलावंतांवर डॉ. गणेश शिंदे यांनी तयार केलेली ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले. आभार कुलसचिव प्रा. प्रशांत अमृतकर यांनी मानले. उद्‌घाटनानंतर लगेचच सहभागी सर्व संघ व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी बैठकीस मार्गदर्शन तर डॉ.संजय बिरंगने यांनी सूत्रसंचालन केले.

अपमान हाच सन्मानाचा पाया : रावबा गजमल 
नाटकातला न देखील माहीत नसलेला, कसल्याही सोयीसुविधा नसतानाही माझ्यासारखा खेड्यातला मुलगा जर दिग्दर्शक होऊ शकतो. तुम्हाला तर सगळं सोयीसुविधा, रंगमंच, युवक महोत्सव यासारखी व्यासपीठ उपलब्ध असताना तुमच्या प्रतिभेला का बहर येणार नाही, असा प्रश्न दिग्दर्शक तथा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी रावबा गजमल यांनी केला. संघर्ष हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पूजलेला असून पदोपदी होणारा अपमान हीच आपल्या सन्मानाची पायाभरणी असते, अशी समजून नाउमेद न होता कामाला लागा. प्रामाणिकपणाने स्वतःला शोधत जा... असेही ते म्हणाले.

WhatsAppImage2025-09-27at2.10.53PM

मराठवाड्यातील अतिवृष्टीचे शोभायात्रेतही दर्शन; वीस संघांचा सहभाग
अतिवृष्टीने मराठवाड्यात मांडलेल्या प्रलयाचे प्रतिबिंब युवक महोत्सवाच्या शोभायात्रेतही उमटले. सहभागी वीसपैकी पाच संघांनी अतिवृष्टीमुळे लोकांच्या झालेल्या हालापेष्टाचे चित्र मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून (वाय कॉर्नर) शनिवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते फेरीस हिरवा झेंडी दाखविण्यात आली.

WhatsAppImage2025-09-27at2.10.52PM1

कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, संघ प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कलावंत यांनी सहभाग घेतला. यानंतर उद्‌घाटन सोहळा व चारही रंगमंचावर कला प्रकारांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याबरोबरच भारतीय संविधान आमचा अभिमान, पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा, पूरस्थिती टाळा असा संदेश दिला. या शोभायात्रेत वीस महाविद्यालयांचा सहभाग होता.

WhatsAppImage2025-09-27at2.10.52PM

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software