महिला बचतगटाचे आता रिलायन्स, डीमार्टमध्येही दिसणार; स्टॉल उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महिला बचतगटांना मॉलमध्ये स्टॉल उपलब्ध करून दिल्यास बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू उपलब्ध होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (२९ ऑगस्ट) बैठक पार पडली. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : महिला बचतगटांना मॉलमध्ये स्टॉल उपलब्ध करून दिल्यास बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू उपलब्ध होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (२९ ऑगस्ट) बैठक पार पडली. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे, माविवेचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, डी मार्ट व्यवस्थापक अनिल जराटे, जसवंत सिंग, फार्म फूड, देवगिरी मार्टचे ज्ञानेश डांगे, रिलायन्स मार्टचे ज्ञानेश्वर बन्सोडे उपस्थित होते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, बचत गटांच्या महिलांना व्यवसायातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणार येत आहे. त्यातून महिलांचे वैयक्तिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. त्यासाठी बचतगटांच्या उत्पादनांना विस्तारीत स्वरुपात बाजारपेठ उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण जिल्हा प्रशासन देईल. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, बचतगटांच्या महिलांनी तयार केलेली उत्पादने शहरात पोहचणे गरजेचे आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही महिला बचत गटांना असे स्टॉल्स उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software