महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २१ जुलैला पूर्व परीक्षा; शहरात ४६ केंद्रे, १४ हजार ७८४ उमेदवार देणार परीक्षा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (२१ जुलै) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर ४६ केंद्रांवर एकूण १४ हजार ७८४ उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहेत. १५७२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (२१ जुलै) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर ४६ केंद्रांवर एकूण १४ हजार ७८४ उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहेत. १५७२ अधिकरी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षार्थींसाठी सूचना
परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही. उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही.

परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल. सुधारीत कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या अर्धा तास पूर्वीपर्यंत (सकाळी साडेनऊपर्यंतच) उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करून घेण्यात यावे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

  • अशी आहे परीक्षा केंद्रांची यादी
  • न्यू हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर, हर्सूल
  • मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, रोजाबाग, हर्सूल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – ए )
  • मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स, रोजा बाग, हर्सूल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – बी)
  • नुतन बहुउद्देशीय विद्यालय जळगाव रोड, हडको एन-११ हर्सूल
  • एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल, प्लॉट नं. ५१, सिडको जळगाव रोड
  • गोदावरी पब्लिक स्कूल (सेकंडरी) विवेकानंदनगर एन-१२ हडको
  • बळीराम पाटील हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, सिडको एन-९ एम-२
  • श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला एन-८ सिडको
  • धर्मवीर संभाजी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्कूल एन-५ सिडको
  • जिजामाता कन्या विद्यालय, एन – ५ सिडको
  • एमजीएम जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय एन- ६ सिडको, सेंट्रल नाकाजवळ
  • एम.जी.एम. पॉलिटेक्निक एन- ६ सिडको, सेंट्रल नाकाजवळ
  • एमजीएम संस्कार विद्यालय, एन-६ सिडको, सेंट्रल नाकाजवळ
  • राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पी-७५, गरवारे पॉलिस्टर एमआयडीसी चिकलठाणा
  • वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री जवळ, चिकलठाणा रोड
  • शिवछत्रपती महाविद्यालय, एन-३ जालना रोड, सिडको
  • सेंट मीरा विद्यालय प्लॉट नं. ११९/बी, एन-३ सिडको
  • सेंट मीरा विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज प्लॉट नं. ११९/बी, एन-३ सिडको
  • मराठवाडा तंत्रज्ञान व संस्था (एमआयटी) हायस्कूल आणि माहिती तंत्रज्ञान कॉलेज एन-४ सिडको
  • डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा ज्युबली पार्क
  • हॉलीक्राॅस मराठी हायस्कूल, लक्ष्मी कॉलनी, कॅन्टामेंट बोर्ड
  • पी.ई.एस. कॉलेज ऑफ अभियांत्रिकी, पानचक्की रोड, नागसेनवन
  • पी.ई.एस. पॉलिटेक्निक पानचक्की रोड, नागसेनवन
  • मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल नागसेनवन
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स नागसेनवन
  • विवेकानंद आर्टस आणि सरदार दिलीपसिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर
  • विवेकानंद कॉलेज ऑफ सायन्स समर्थनगर
  • एस.बी.ई.एस. कॉलेज ऑफ सायन्स औरंगपुरा
  • एस.बी.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्‌स आणि कॉमर्स पार्ट – ए औरंगपुरा
  • एस.बी.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्‌स आणि कॉमर्स पार्ट – बी औरंगपुरा
  • सरस्वती भुवन मुलाची शाळा, औरंगपुरा
  • महिला मंडळ संचलित शिशु विहार हायस्कूल, बलवंत वाचनालयाच्या बाजूला औरंगपुरा
  • ए.के. वाघमारे प्रशाला सरस्वतीनगर, औरंगपुरा
  • डॉ.सौ. इंद्राबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, आर्ट्‌स, समर्थनगर
  • वसंतदादा पाटील हायस्कूल, धूत हॉस्पिटलजवळ, रामनगर, एन-२ सिडको, जालना रोड
  • शिवाजी हायस्कूल खोकडपुरा, शिवाजीनगर
  • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा
  • शासकीय पॉलिटेक्निक, उस्मानपुरा
  • देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड, उस्मानपुरा पार्ट (बी)
  • देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड, उस्मानपुरा पार्ट (सी)
  • नागसेन विद्यालय फुलेनगर पीरबाजार, उस्मानपुरा
  • जी.एस.मंडल महाराष्ट्र इन्स्‍टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (बी.टेक) गेट नं. ५ सातारा गाव, बीड बायपास रोड
  • मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेनवन
  • मिलिंद कॉलेज ऑफ आर्टस, नागसेन वन
  • जय भवानी हायस्कूल, आर्ट्‌स ॲण्ड सायसन्स कॉलेज जय विश्व भारती कॉलनी गारखेडा परिसर
  • शासकीय महाविद्यालय, आर्ट्‌स आणि विज्ञान, सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software