तासभर क्रांती चौक ठप्प!; राजश्रीताई उंबरे यांच्या उपोषणाला मराठ्यांचा मोठा प्रतिसाद लाभतोय, रोज हजारो बांधव एकवटून देताहेत पाठिंबा, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : मराठा आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरे यांना मोठा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. उपोषणाला पाच दिवस उजाडूनही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने समाजात संतापाची भावना असून आज, 6 सप्टेंबरला हा संताप पुन्हा बाहेर पडला. आंदोलनस्थळी क्रांती चौकात शेकडो मराठा बांधवांनी ठिय्या देत वाहतूक बंद पाडली. दुपारी चारच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : मराठा आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरे यांना मोठा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. उपोषणाला पाच दिवस उजाडूनही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने समाजात संतापाची भावना असून आज, 6 सप्टेंबरला हा संताप पुन्हा बाहेर पडला. आंदोलनस्थळी क्रांती चौकात शेकडो मराठा बांधवांनी ठिय्या देत वाहतूक बंद पाडली. दुपारी चारच्या सुमारास अचानक सुरू केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत चौकात चारही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजश्रीताई उंबरे क्रांती चौकात उपोषणाला बसल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या आंदोलनाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपोषणाची माहिती सर्वदूर पोहोचवत असून हजारो समाजबांधव उपोषणस्थळी येऊन राजश्रीताईंना पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे क्रांती चौकातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सरकार वेळीच दखल घेत नसल्याने हे आंदोलन व्यापक रुप धारण करत चालले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश

Latest News

लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाचखोर तत्कालीन पोलीस अंमलदार यमाजी लक्ष्मण खटाणे (रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला शुक्रवारी (६...
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Update : तलावात पोहत असताना दोन मुलांचा बुडून मृत्‍यू, हर्सूल सावंगीजवळील नायगावची दुर्दैवी घटना, दोन्ही मुले बायजीपुऱ्याचे!
धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software