- News
- सिटी डायरी
- कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची, चौकशी समिती, जिल्हास्तरीय तक्रार समित...
कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची, चौकशी समिती, जिल्हास्तरीय तक्रार समिती साठी प्रस्ताव मागविले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम – २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती कार्यरत असते. ही समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अनुभव असलेल्या पात्र व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा महिला व बाल […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम – २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती कार्यरत असते. ही समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अनुभव असलेल्या पात्र व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तथा सदस्य सचिव,जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती श्रीमती आर.एन. चिमंद्रे यांनी कळविले आहे.
२. तसेच अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला.
वरीलप्रमाणे आवश्यक अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तिक परिचय पत्र, पोलीस अधीक्षक यांचेकडून प्राप्त चारीत्र्य प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि.१६ जुलै पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्लॉट नं.९, श्री.जाधव यांची इमारत, खोकडपूरा,छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या कालावधीनंतर येणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे यांनी केले आहे. आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 17:20:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...

