धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून करमाड पोलीस ठाण्यात जमवला मोठा जमाव!; नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे दोन भिन्न धर्मीय व्यक्‍तींनी करमाड पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध रविवारी (२८ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या तक्रारीत गणेश जनार्धन सोनवणे (वय २८, रा. शेकटा) याने म्हटले आहे, की तो खासगी नोकरी करतो. कुटुंबासह गावात राहतो. रविवारी सायंकाळी सहाला गावातील जालना- छत्रपती संभाजीनगर रोडवरील सय्यद समीर सय्यद गोरुपाशा याच्या पानटपरीवर गेला होता. गणेशने त्याला राम राम म्हणत नमस्कार घातला. त्यावर सय्यद समीरने वाईट शब्दांत बोलून धार्मिक भावना दुखावल्या. गणेशला त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर गणेशने त्याचा भाऊ रमेश सोनवणे, राम भाऊसाहेब जाधव, प्रितम हिरचंद गोलवाल यांना घडलेला प्रकार सांगितला.

गणेश पोलीस ठाण्यात जाण्याआधीच सय्यद समीरने गावातील व परिसरातील मुस्लीम समाजातील जमाव जमवून गणेशविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा वाद वाढू नये म्हणून लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊ दिले नाही. त्यामुळे गणेशने सोमवारी (२९ सप्टेंबर) पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सय्यद समीर सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी धार्मिक वाद झाल्यानंतर सय्यद समीरने लगेचच जमाव जमवून पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

त्यात म्हटले आहे, की तो शेकटा गावात पान टपरी चालवतो. पानटपरीवर तो असताना गणेश आला. तो म्हणाला की, संध्याकाळची वेळ आहे, तू लाईट चालू करताना देवाचे नाव घे. त्यावर सय्यद समीरने त्याला ऐसा क्यू? असा प्रश्न केला. त्यानंतर गणेशने त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याने समीरने म्हटले आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!

Latest News

वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले! वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर मंगळवारी (१७ मार्च) भल्या पहाटे साडेपाचला...
‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software