रास दांडिया पाहत असताना तरुणांमध्ये हाणामारी, टीव्ही सेंटर चौकातील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रास दांडिया पाहत असताना दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. यात एकाने दुसऱ्याच्या तोंडावर दगड मारल्याने तो जखमी झाला. घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री पावणेनऊला घडली.

हर्ष सुभाष सुरडकर (वय २०, रा. सिध्दार्थनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडील, भावासोबत राहतो. १२ वी शिकतो. गुरुवारी रात्री पावणेनऊला तो व त्याचा मित्र कुणाल हिवाळे रास दांडिया पाहण्यासाठी टीव्ही सेंटर चौकात गेले होते. जिजाऊ चौकात दांडिया पाहत असताना हर्षचा ओळखीचा मुलगा भूषण संजय साळवे (रा. दत्तनगर, जटवाडा रोड) याने त्याच्याकडे येत तू येथे काय करतोस असे म्हणून वाद घालायला सुरुवात केली.

हर्ष त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना भूषणने त्याला शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. तेथेच खाली पडलेला दगड त्याच्या तोंडावर मारल्याने हर्ष जखमी झाला. त्यानंतर भूषण तेथून निघून गेला. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हर्षने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भूषण साळवेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार देविदास राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संशयास्पद वीज मीटर बदलणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, पटेलनगरातील घटना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software