हिट ॲन्‍ड रन : सुसाट कारने दुचाकीला उडवले, पित्‍यासह दोन मुली जखमी, अण्णा भाऊ साठे चौकातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासगी नोकरदार व्यक्‍ती दोन्ही मुलींना कॉलेजमधून घेऊन घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला सुसाट कारने उडवले. यात तिघेही जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. कारचालकाने गाडी न थांबवता कारसह पळून गेला. ही घटना शनिवारी (४ ऑक्‍टोबर) दुपारी सव्वा चारला अण्णा भाऊ साठे चौकात घडली. सिटी चौक पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद अथर मोहम्मद अजीज शेख (वय ४७, रा. अरफाज मशिदीजवळ, किराडपुरा, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी, दोन मुले, दोन मुलींसह राहतात. उस्मानपुरा येथील युनिक पेट्रोलपंपावर खासगी नोकरी करतात. शनिवारी दुपारी सव्वा चारला ते डिस्कव्हर मोटारसायकलीने (MH 20 CV 7911) दोन्ही मुली अतीया (वय १८) व अमीना (वय १२) यांना घेऊन पीईएस कॉलेजहून घराकडे टाऊनहॉलमार्गे येत होते.

अण्णा भाऊ साठे चौकात काळ्या कारने (MH21 BV0329) डाव्या बाजूने येऊन त्यांना धडक दिली. त्यामुळे अथर व त्यांच्या दोन्ही मुली जखमी झाल्या. मोटारसायकलीचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. मोबाइल रोडवर पडून ३ हजार रुपयांचे नुकसान झाले. कारचालकाने त्याची कार थांबवितो, असे म्हणून कार पुढे पुढे नेत कार न थांबविता तेथून कारसह पळून गेला. पोलीस अंमलदार भरत ढवण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software