शरीरावर कुठलेही व्रण, प्रकार नाहीत...५ वर्षीय राशीचा मृत्यू विहिरीत बुडूनच, पण ती विहिरीपर्यंत गेली कशी?, छत्रपती संभाजीनगरच्या घटनेने वाढवले गूढ 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) :  पळशी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील ओमकार सिटी या बांधकाम साइटवरील कामगाराच्या हरवलेल्या मुलीचा मृतदेह शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचला पारधेश्वर मंदिराजवळील विहिरीत आढळला होता. तिचा मृत्यू पाण्यात बुडून म्हणजे फुप्फुसात पाणी जाऊनच झाला आहे. शरीरावर अन्य कुठलेही व्रण किंवा प्रकार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने या मृत्यूच आणखीनच गूढ निर्माण झाले आहे. यामागे अनेक कारणे समोर येत आहे.

मृतदेह ज्या विहिरीत आढळला, ती विहीर रस्‍त्‍यापासून ३० फूट आत आहे. शिवाय झाडाझुडुपांच्या आड दडलेली आहे. तिच्याभोवती ३ फूट उंच कठडे आहेत. एवढ्या उंच कठड्यावरून ती पडली, तर कशी पडली असेल, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. राशीला पेरू खाण्याची आवड होती, ती शेतातून पेरू तोडून फ्रॉकमध्ये भरून घरी आणत असायची. त्यामुळे ती पेरू आणण्यासाठी शेताकडे गेली असावी, असा अंदाज पोलिसांना वर्तवला आहे. मात्र तरीही विहिरीकडे ती का गेली आणि कशी पडली, या प्रश्नांचे गूढ कायम आहे. शनिवारी तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी पार पडली. तिच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे. आता पोलीस मृत्यूचे गूढ उकलण्यात लागले आहेत.

११ नोव्‍हेंबरला बेपत्ता, १४ नोव्हेंबरला आढळला मृतदेह...
राशी सिनू चौहान (वय ५ वर्षे ५ महिने, रा. खापरखेडा, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, ह. मु. ओमकार सिटी, पळशी रोड, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. सिनू रामा चौहान (वय २३) यांनी त्यांची मुलगी राशी हरवल्याची तक्रार चिकलठाणा पोलीस ठाण्यात ११ नोव्‍हेंबरला दिली होती. ते ३ महिन्यांपासून पत्नी सुनिता, मुलगी आरोशी, मुलगा आयुश यांच्यासह ओमकार सिटी येथील बांधकाम साइटवर लेबर म्हणून कामाला आले होते. त्यांची मोठी मुलगी राशी मामाकडे मूळगावी राहत होती. मात्र घटनेच्या १५ दिवसांपूर्वीच ती आई- वडिलांकडे राहायला आली होती.

११ नोव्‍हेंबर रोजी सकाळी ९ ला सिनू घराशेजारीच काम करण्यासाठी गेले होते. पत्नी आणि तिन्ही मुले घरीच होते. दुपारी २ ला सिनू जेवणासाठी घरी आले तेव्हा राशी मुलांसोबत खेळत होती. त्यानंतर सिनू कामावर गेले. दुपारी अडीचला त्यांनी पुन्हा मुलांकडे लक्ष दिले असता मुलगी राशी दिसली नाही. त्यामुळे सिनू यांनी लेबर आणि ठेकेदारासोबत मिळून राशीचा शोध घेतला. सायंकाळी ७ पर्यंत राशी कुठे दिसली नाही. अखेर चिकलठाणा पोलिसांना कळवले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला ओमकार सिटीच्या २०० ते ३०० मीटर अंतरावरील पारधेश्वर मंदिराजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत पोलिसांनी पुन्हा तपासले असता राशीचा मृतदेह तरंगताना आढळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी राशीचा मृतदेह बाहेर काढला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software