त्रिमूर्ती चौकातील ऑप्टीमार्ट दुकानात चोरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : त्रिमूर्ती चौकातील रंगोली कलेक्शनसमोरील ऑप्टीमार्ट ऑप्टीकलमध्ये चोरी झाल्याची घटना मंगळवारी (२ डिसेंबर) सकाळी ९ ला समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुभम बाबासाहेब लोखंडे (वय २६, रा. जुना भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो गजानन राजूभाऊ ठोंबरे यांचे ऑप्टीमार्ट ऑप्टीकलमध्ये (त्रिमूर्ती चौक, रंगोली कलेक्शनच्या विरुद्ध बाजूला छत्रपती संभाजीनगर) सेल्समन आहे. तो एकटाच ऑप्टीकलचे पूर्ण काम पाहतो. सोमवारी (१ डिसेंबर) रात्री १० ला त्याने दुकान बंद केले. शटर लॉक करून घरी गेला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (२ डिसेंबर) सकाळी ९ ला दुकानाच्या बाजूच्या हेअर कटींग दुकानवाले बंडू भाऊ यांनी शुभमला कॉल करून सांगितले की, तुझे दुकानाचे शटर अर्धे उघडे दिसत आहे. ते कोणीतरी उचकटलेले दिसत आहे. त्यामुळे शुभम तातडीने दुकानाकडे आला. दुकानाची पाहणी केली असता टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम २३ हजार ८७० रुपये चोरून नेल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलीस अंमलदार संदीप जमधडे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software