- News
- सिटी क्राईम
- महिलेची अंतर्वस्त्रे चोरून न्यायचा, एकेदिवशी रंगेहात पकडला, सिडको वाळूज महानगरात जे घडलं ते धक्कादा...
महिलेची अंतर्वस्त्रे चोरून न्यायचा, एकेदिवशी रंगेहात पकडला, सिडको वाळूज महानगरात जे घडलं ते धक्कादायक...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महिलेची अंतर्वस्त्रे कायम चोरी जायची. तिला कळतं नव्हतं, की हे कोण आणि कशासाठी करतेय... एकेदिवशी तिने लक्षच ठेवलं आणि शेजारच्या अल्पवयीन मुलाला रंगेहात पकडले. लजास्पद कृत्य करतान पकडले गेल्यावरही या मुलाने चक्क महिलेला अश्लील इशारे केले. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना वाळूज एमआयडीसीतील सिडको वाळूज महानगर १ मध्ये मंगळवारी (७ ऑक्टोबर) घडली. मुलाविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंतर्वस्त्रे चोरण्याची प्रवृत्ती हा एक मानसिक विकार असून, यामागे विशिष्ट मानसिक कारणे असतात. याला सामान्यतः क्लेप्टोमॅनिया (Kleptomania) किंवा कधी कधी फेटिशिस्टिक विकार (Fetishistic Disorder) शी संबंधित मानले जाते. काही लोकांना अंतर्वस्त्रांसारख्या वस्तूंशी लैंगिक आकर्षण वाटते आणि त्यातून आनंद मिळतो. अशा वेळी ते त्या वस्तू मिळवण्यासाठी चोरी करतात. ताण, एकटेपणा, किंवा उदासीनता कमी करण्यासाठीही व्यक्ती असे वर्तन करू शकते. अशा व्यक्तीने मानसोपचार तज्ञांकडे जाणे गरजेचे आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

