हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्‍टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. ही घटना गुरुवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

प्रफुल्ल मधुकर महाजन (वय ३२, रा. सुनसगाव बुद्रूक ता. जामनेर जि. जळगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते जामनेर आगारात एसटी बसचालक म्‍हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (१४ ऑगस्ट) दुपारी दीडला ते भुसावळहून पुण्यासाठी बसमध्ये  (MH14 MH 6461) प्रवासी घेऊन निघाले होते. सायंकाळी साडेसहाला हडको कॉर्नरवरील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर आल्यानंतर सिग्नल लागल्याने बस थांबवली. त्‍याचवेळी मागून ट्रॅक्टरने ( MH20 AB 4487) धडक दिली. त्‍यामुळे बसचे उजव्या बाजूचे एकूण १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सिटी चौक पोलिसांनी ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रमोद पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले

Latest News

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्‍टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले....
वाळूज MIDC त १६ वर्षीय मुलगी लैंगिक अत्‍याचारातून प्रेग्‍नंट!; बाळाला जन्म दिला... मुलगी बाळाचा बाप कोण सांगत नसल्याने पोलीस स्वतःहून करताहेत तपास!
सुसाट हमसफर ट्रॅव्हल्स धडक देऊन पसार, युवकाचा जागीच मृत्‍यू, मिटमिटा येथील घटना
मोठी बातमी : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या भाविकाचा मृत्‍यू, अंगावर दरड कोसळली
जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्‍याला तिघांनी भोसकले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software