जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्‍याला तिघांनी भोसकले!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाधववाडी बाजार समितीतील मंडीत तिघांनी एका फळविक्रेत्‍यावर चाकूने निर्घृण वार केले. यात फळविक्रेता गंभीर जखमी झाला आहे. त्‍याला वाचवायला मध्ये पडलेल्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (१४ ऑगस्‍ट) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

सिडको पोलिसांनी हल्लेखोर सईद खान कबीर खान, कदीर खान कबीर खान, इर्शाद खान सईद खान (सर्व रा. कैसर कॉलनी फातेमा मुलीच्या शाळेसमोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख मुजीब शेख रज्जाक (वय ३८, रा. संजयनगर बायजीपुरा) असे गंभीर जखमी फळविक्रेत्‍याचे नाव आहे. ते जाधववाडीत फळ विक्री करतात. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ते दुकानावर फळविक्री करत असताना त्‍यांच्या ओळखीचे सईद खान कबीर खान, कदीर खान कबीर खान, इर्शाद खान सईद खान (सर्व रा. कैसर कॉलनी) आले.

तू येथे फळ विकू नको. ही दुकान आमची आहे, असे म्हणून त्यांनी मुजीब यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की सुरू केली. इर्शाद खानने चाकूने मुजीब यांच्या छातीवर, पाठीवर, हातावर वार केले. यात मुजीब गंभीर जखमी होऊन कोसळले. त्‍यानंतर तिघांनी त्यांच्या खिशातील ६ हजार रुपये हिसकावले. मुजीब यांना वाचवायला धावलेल्या शेख मोबीन शेख रज्जाक यालाही त्‍यांनी मारहाण केली. हे दुकान आमचे आहे. तुम्ही जर येथे फळविक्री करण्यासाठी परत आले तर तुम्हाला जीवे मारू, अशी धमकी देऊन ते निघून गेले. मुजीब यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले

Latest News

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्‍टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले....
वाळूज MIDC त १६ वर्षीय मुलगी लैंगिक अत्‍याचारातून प्रेग्‍नंट!; बाळाला जन्म दिला... मुलगी बाळाचा बाप कोण सांगत नसल्याने पोलीस स्वतःहून करताहेत तपास!
सुसाट हमसफर ट्रॅव्हल्स धडक देऊन पसार, युवकाचा जागीच मृत्‍यू, मिटमिटा येथील घटना
मोठी बातमी : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या भाविकाचा मृत्‍यू, अंगावर दरड कोसळली
जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्‍याला तिघांनी भोसकले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software