वाळूज MIDC त १६ वर्षीय मुलगी लैंगिक अत्‍याचारातून प्रेग्‍नंट!; बाळाला जन्म दिला... मुलगी बाळाचा बाप कोण सांगत नसल्याने पोलीस स्वतःहून करताहेत तपास!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार करून प्रेग्‍नंट केल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज एमआयडीसीत समोर आला आहे. मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणात मुलगी आणि तिचे नातेवाइक काहीच बोलायला तयार नसल्याने संशयिताचे नावही अद्याप समोर आलेले नाही. त्‍यामुळे पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुरुवारी (१४ ऑगस्‍ट) गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने छत्रपती संभाजीनगरला वर्ग केला आहे. सध्या तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक भाग्‍यश्री शिंदे करत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले, की घनसावंगी ग्रामीण रुग्णालयातून पोलिसांना अल्पवयीन मुलगी उपचारासाठी दाखल झाल्याचे सांगितले होते. त्‍यामुळे पोलिसांनी लगेचच रुग्णालयात येऊन मुलीचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला.

मुलगी पैठण तालुक्‍यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. संशयित वाळूज एमआयडीसीत राहत असल्याचे आणि त्‍याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच लैंगिक अत्‍याचार करून तिला प्रेग्‍नंट केल्याचे समोर येत आहे. मुलीच्या पालकांनी तिला प्रसुतीसाठी अंबडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे मुलीने एका पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिला आणि कुणाला काही एक न सांगता तिथून जाण्याचा प्रयत्‍न केला. मात्र ही बाब पोलिसांना कळल्यानंतर त्‍यांना थांबवून चौकशी सुरू केली. सध्या मुलगी व तिच्या बाळाला अधिक उपचारासाठी जालना येथील स्‍त्री रुग्णालयात दाखल केले आहे. संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले

Latest News

हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले हडको कॉर्नरजवळ एसटी बसला मागून ट्रॅक्‍टर धडकले
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हडको कॉर्नरजवळील दी पॅसिफिक हॉस्पिटलसमोर एसटी बसला ट्रॅक्‍टर मागून धडकले. यात बसचे मोठे नुकसान झाले....
वाळूज MIDC त १६ वर्षीय मुलगी लैंगिक अत्‍याचारातून प्रेग्‍नंट!; बाळाला जन्म दिला... मुलगी बाळाचा बाप कोण सांगत नसल्याने पोलीस स्वतःहून करताहेत तपास!
सुसाट हमसफर ट्रॅव्हल्स धडक देऊन पसार, युवकाचा जागीच मृत्‍यू, मिटमिटा येथील घटना
मोठी बातमी : केदारनाथ यात्रेला गेलेल्या बजाजनगरच्या भाविकाचा मृत्‍यू, अंगावर दरड कोसळली
जाधववाडी मंडीत राडा; फळविक्रेत्‍याला तिघांनी भोसकले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software