बजाजनगरात थरारपट घडवणाऱ्या तिन्ही गावगुंडांच्या मुसक्या आवळल्या!, दिसेल त्याच्यावर वार केले होते, धिंड काढण्याची मागणी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात थरारपट घडवणाऱ्या ३ गावगुंडांच्या मुसक्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास आवळल्या. वाळूज एमआयडीसी परिसरातीलच खवड्या डोंगराजवळ ही कारवाई करण्यात आली. तिघांनी दुचाकीवरून येत दिसेल त्याच्यावर तलवारी वार केले, दुचाकी वाहनांचेही नुकसान केले होते. ज्या पद्धतीने या गावगुंडांनी दहशत माजवली होती, ते पाहता त्यांची त्याच भागातून धिंड काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ऋषीकेश उर्फ मारी शालीक सोनवणे (वय १९), प्रकाश रमेश गायकवाड (वय २५) व अभिजीत किशोर फाटे (वय २२, सर्व रा. वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी पकडलेल्या गावगुंडांची नावे आहेत. घटनेबाबत सूत्रांनी सांगितले, की पैशाच्या जुन्या वादातून मधुकर रामा भालेराव (वय ३५, रा. एसटी कॉलनी, बजाजनगर) याला धडा शिकवण्याच्या तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास तिघे गावगुंड बजाजनगर परिसरात व महाराणा प्रताप चौकात आले. हातात तलवार व लाकडी दांडे घेऊन दुचाकीवरून फिरत दहशत निर्माण करत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी मधुकर भालेराव याच्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

विरोधी पक्षांच्या नेत्‍यांनी थेट पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात घडत असलेल्या या प्रकारावरून टीका केली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला. तिघे गावगुंड रात्री खवड्या डोंगरावर मुक्कामासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा मधुकर भालेराव यांच्या घरासमोर जाऊन खुन्नस दिली व मनमाडला पलायन केले. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्यांनी मोबाइल फोन बंद ठेवले होते. फरारी तिघे शुक्रवारी (९ जानेवारी) सायंकाळी खवड्या डोंगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ते पायी खवड्या डोंगराकडे येत होते. पोलिसांना पाहून वेगवेगळ्या दिशेने पळाले होते. मात्र पोलिसांनी दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर व सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, प्रविण पाथरकर, पोलीस अंमलदार अरुण उगले,  नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके,  संदीप तागड, रोहीत चिंचाळे व शिवनारायण नागरे यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software