चिकलठाण्यातील कसायाच्या घरावर पोलीस, दंगा काबू पथकाचा हल्लाबोल!; किचनमध्येच करायचा गोवंशांच्या कत्तली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसी पोलिसांच्या फौजफाट्याने दंगा काबू पथकासह चिकलठाण्यातील कसायाच्या घरावर गुरुवारी (२५ डिसेंबर) दुपारी ३ ला हल्लाबोल केला. या कसायाने राहत्‍या घरातच कत्तलखाना सुरू केला होता. किचनमध्ये हौद बांधून गोवंशांच्या कत्तली घडवत होता. पोलिसांशी त्याने वाद घालत आत्‍महत्‍येची धमकी दिली. पोलिसांनी त्याला न जुमानता खाक्या दाखवला. घरातून १३ कोयते, चाकू जप्त केले.

गफार कुरेशी (रा. चिकठाणा) याच्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांना पाहून गफारने धिंगाणा घालायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याला जुमानले नाही. घरात प्रवेश करताच लाकडी बाकावर धारदार कानस, सुरे, कुऱ्हाड अशी शस्त्रे मिळून आली. विविध डब्यांत कापून ठेवलेले गोमांसही आढळले. पॉलिथिन बॅगमध्येही गोमांस भरून ठेवलेले होते. ओपन टेरेसवर ४ फूट खोल हौद बांधलेला होता. पोलिसांनी हौदात डोकावताच इतकी दुर्गंधी आली, की ते सहन करू शकले नाही.

हौदात हाडांचा मोठा साठा व रक्त होते. बाल्कनीतदेखील कापलेल्या जनावरांचे अवशेष विखुरलेले होते. वडोद बाजार येथून खरेदी केलेल्या जनावरांची बिले मिळून आली. दोन जीवंत जनावरे आढळली. ७० ते ८० पेक्षा अधिक गोवंशांची कत्तल घडवून आणल्याचे दिसून आले. पोलिसंनी ३५ मांस, जनावरांचे अवशेष जप्त केले. गफार कुरेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनोज पगारे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे, पोलीस अंमलदार संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, रतनसिंग नागलोत, महिला अंमलदार गौरी भंडारी यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software