शाळेत जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करायचा, पालकांनी तिचे शिक्षण बंद केले, आता तोच मुलगा मुलीला घेऊन पसार..., चिकलठाणा परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा पाठलाग करतो म्हणून पालकांनी दहावीतल्या मुलीचे शिक्षण बंद केले. पण त्यानंतर तोच मुलगा मुलीला घेऊन पळून गेल्याचा संशय आहे. ही घटना मंगळवारी (९ डिसेंबर) पहाटे चारला समोर आली.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, कंपनीत खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीची दहावीत शिकणारी १५ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना गावातीलच एक मुलगा पाठलाग करत होता. ही बाब मुलीच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी तिचे शिक्षण बंद केले. सोमवारी (८ डिसेंबर) रात्री जेवण करून सर्वजण झोपलेले असताना मुलगी मध्यरात्रीतून घरातून निघून गेली. ही बाब मंगळवारी पहाटे चारला समोर आल्यानंतर तिच्या वडिलांनी शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिचा पाठलाग करणारा मुलगाही घरी दिसून आला नाही. त्यानेच मुलीला पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त करत पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software