अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून फिरवले आणि तिचा शोध सुरू झाल्याचे कळताच रांजणगाव शेणपुंजीत आणून सोडले. तू तक्रार केली तर तुझ्या आईला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने मुलीला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र यावेळी पोलिसांचा धक्कादायक अनुभव पीडितेला आला. रात्री ८ ला मुलगी आणि तिची आई पोलीस ठाण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र पहाटे तीनला या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत आहे. त्‍यानंतर या मायलेकी पोलीस ठाण्याबाहेर पडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या या कारभारामुळे खळबळ उडाली आहे. दीर्घकाळ पीडितेला बसवून ठेवल्यामुळे संताप व्यक्‍त होत आहे.

नवनाथ वरे (वय ४५, रा. छत्रपतीनगर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी परिसर) असे संशयिताचे नाव आहे.
नक्की काय घडलं?
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, मुलीची आई आणि नवनाथ यांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक औषधी विकण्याचे काम ते करायचे. तेव्हापासून नवनाथची मुलीवर आणि तिच्या आईवर वाईट नजर होती. तो घरी कुणी नसताना यायचा आणि मुलीसोबत अश्लील चाळे करायचा. एकेदिवशी त्‍याला मुलीच्या आईने रंगेहात पकडले आणि घराबाहेर हाकलले होते. मात्र बदनामीच्या भीतीने त्‍याच्याविरुद्ध पोलीस तक्रार दिली नव्हती. तो शेजारी राहत असल्याने मुलीला अनेकदा वाईट नजरेने निरखून पहायचा.

तिला अश्लील इशारे करून खुणवायचा. एक महिन्यापूर्वी नवनाथने तिला रांजणगाव शेणपुंजीच्या रिक्षास्थानकावर गाठून मोबाइल दिला. त्‍यावेळी तो म्हणाला, की तुझ्या मम्मीचे कोणासोबत काही चालू आहे का, तू १८ वर्षांची होऊ दे, मग तुझ्याकडे आणि तुझ्या मम्मीकडे बघतो, असे धमकावून तो निघून गेला. सोमवारी (१५ सप्‍टेंबर) सायंकाळी साडेसहाला ती तिचा मोबाइल दुरुस्त करण्यासाठी दुकानावर गेली असता तिथे नवनाथ अचानक आला. त्‍याने तिला घरी सोडतो असे म्‍हणून गाडीवर बसवले.

मात्र घरी न सोडता पंढरपूर, पाटोद्याकडे नेले. दुचाकीवर असताना मुलीला म्हणाला, की मला चिकटून बस, असे म्‍हणून दोन तास फिरवले. नंतर रांजणगाव शेणपुंजीत लक्ष्मी माता मंदिराजवळ तिला सोडले. यावेळी त्‍याने धमकावले, की माझी तक्रार केली तर तुझ्या आईला जीवंत सोडणार नाही. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर महिलेने तिच्या पती व भावाला हा प्रकार कळवला. त्‍यानंतर सर्व जण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software