कुख्यात गुंड टिप्याची रवानगी हर्सूल कारागृहात!; सलग दोन दिवस पोलिसांनी धिंड काढल्याने इतका अपमानित झाला की... 

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धिंड काढली जात असल्याने अपमानित होऊन टिप्याने चालण्यास नकार दिला तेव्हा त्‍याला पोलिसांनी ज्‍या पद्धतीने उचलले, ते छायाचित्र मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राने प्रसिद्ध केले, जे राज्‍यभर गाजले. या टिप्याची रवानगी आता न्यायालयाने हर्सूल कारागृहात केली आहे. त्‍याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

टिप्या अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असायचा. म्हणजेच खबऱ्या म्हणून काम करायचा. गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत होता. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. नंतरच्या काळात टिप्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. त्‍याच्याविरुद्ध लुटमार, खंडणी, दंगल, विनयभंग, पोलिसांवर हल्ला असे २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहाबाहेर पडताच त्‍याची गुन्ह्यांची मालिका सुरू होते. त्‍याला व त्याच्या टोळीला काही अवैध व्यावसायिकांनी पोसले आहे.

गेल्या २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शेख अझर शेख (वय ४०, रा. गारखेडा) यांना टिप्याने तलवारीचा धाक दाखवून लुटले होते. अझर यांची दुचाकी ताब्यात घेत अडीच लाख रुपये लुटून नेत वर १ लाख रुपयांची खंडणीदेखील मागितली होती. हा प्रकार करण्यापूर्वी तो पंधरा दिवस आधीच जामिनावर बाहेर आला होता. तरीही त्याने पुन्हा हा गुन्हा केला होता. पुंडलिकनगर पोलिसांच्या धाकाने तो २६ ऑगस्ट रोजी थेट न्यायालयात हजर झाला. त्यानंतर पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी ९ सप्टेंबरला त्याला हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली होती. पुंडलिकनगर पोलिसांनी सलग दोन दिवस धिंड काढून त्याला अपमानित केले. यात १२ सप्‍टेंबरला टिप्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत रस्त्यावर धिंगाणा घातला होता. अखेर पोलिसांनी त्याला अशा पद्धतीने उचलले, की त्‍याचे छायाचित्र राज्‍यभर गाजले. अनेकांनी पोलिसांच्या दबंगगिरीचे स्वागत केले. ते छायाचित्र आम्‍ही या बातमीसोबत पुनर्प्रकाशित केले आहे. या अपमानामुळे टिप्याने १५ सप्टेंबरला पोलिसांना धमकीही दिली. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍याची अधिक कोंडी करण्यासाठी आणखी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

टिप्या विजयनगरात राहतो. त्‍याची विजयनगर, पुंडलिकनगर परिसरात दहशत आहे. काही वर्षांपूर्वीही कारागृहाबाहेर पडल्यानंतर पुंडलिकनगर रस्‍त्‍यावर मैत्रिणीच्या वाढदिवसाचे त्‍याने सेलिब्रेशन केले होते, ज्‍याची पूर्ण शहरात चर्चा झाली होती. हातात बिअरची बाटली, सिगारेट घेऊन तो मैत्रिणीसोबत कारवर नाचला होता. त्‍यावेळी त्‍याची ही मैत्रिण पुणे जिल्ह्यातील तत्‍कालिन डीवायएसपींची मुलगी असल्याचे समोर आले होते. टिप्याविरुद्ध ४ जणांच्या खुनाचे आरोप आहेत. नोव्‍हेंबर २०१८ मध्ये दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरून त्‍याने चाकूने भोसकून एकाची हत्‍या केली होती. एका पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्‍नही त्‍याने केला होता. तो स्वतःला संभाजीनगरचा किंग म्‍हणवतो. त्‍याचे साथीदार त्‍याचे व्हिडीओ तयार करतात. टिप्‍याने हातावरही मौत असे गोंदवून ठेवले आहे. त्‍याच्या मोबाइलच्या क्रमांकाचेही शेवटचे आकडे ३०२ असतात, एवढेच नाही तर त्‍याच्या गाडीचा क्रमांकही ३०२ आणि गाडीसमोर मौत असे लिहिलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software