जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरले अन्‌ पुढे घडला हा थरार...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सकाळी १० ची वेळ, जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी शिरल्याची माहिती... तातडीने कमांडो दाखल झाले, बॉम्ब शोधक व नाशक पथकही धावले...जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनपर्यंत सतर्कतेने जात कमांडोंनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासमोरच एका अतिरेक्याला पकडले... तर दुसऱ्याला दुसऱ्या टीमने परिसरात पकडले अन्‌ सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.. तुम्‍ही ही बातमी घाबरून गेला असाल तर तसं करू नका, कारण हा सर्व प्रात्‍यक्षिकाचा भाग होता... कधी अशी परिस्थिती उद्‌भवलीच तर यंत्रणा तयार हवी, यासाठी हा सराव आज, १५ सप्‍टेंबरला करण्यात आला.

547362954_1120053070225721_73428 (1)

दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्‌भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करून सराव करण्यात आला. सकाळी १० ते १२ या वेळेत हा थरार रंगला. जलद प्रतिसाद दलाचे पीएसआय सतिष दिंडे, कमांडो प्रशिक्षक आकाश घोडके, अजिंक्य गाजरे व अन्य २२ कमांडो, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे १ अधिकारी ७ अंमलदार व १३ कमांडो हजर होते. अतिरेक्यांनी केलेला हल्ला, दडून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करून अतिरेक्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे आदी अभ्यास या प्रात्यक्षिक सरावात करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या निरीक्षणात हा सराव अभ्यास करण्यात आला, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी कळविले आहे.

548196576_1120053100225718_72340 (1)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software