महापालिकेचे अपयश महावितरणच्या खांद्यावर देणार!; गुंठेवारी न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत होणार!!, यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याऐवजी नागरिकांना वेठीस धरण्याचा अफलातून प्रकार...

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : प्रशासक राजमध्ये बुडालेल्या महापालिकेला आर्थिक जुळवा जुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत कामचुकारपणा कमालीचा बोकळला आहे. त्‍यांच्यावर कारवाई करून प्रशासनात शिस्त आणण्याऐवजी महापालिका आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी तिजोरी भरण्यासाठी आपला भार महावितरणच्या खांद्यावर काही प्रमाणात देण्याचा निर्णय घेतला आहे. जे लोक गुंठेवारी योजनेअंतर्गत अनधिकृत मालमत्ता अधिकृत करून घेत नाहीत, त्‍यांना नोटीसा देऊन विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे.

गेल्या ३ दशकांत शहराच्या आसपासच्या ग्रीन झोनमधील जमिनींवर अनधिकृत प्लॉटिंग होऊन तिथे आजघडीला मोठ-मोठ्या इमारती उभ्यारल्या गेल्या आहेत. सुमारे १५० ते २०० पर्यंत अशा अनधिकृत वसाहती आहेत. गुंठेवारीअंतर्गत मोडणाऱ्या मालमत्ताधारकांना इमारत, घर, रिकामे प्लॉट अधिकृत करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र नागरिकांना यात येणाऱ्या अडचणी निवारण्याकडे अधिकारी वर्गाचा कल राहिला नाही. अनेकदा चकरा मारायला लावण्याचे प्रकार घडत आहे.

एजंटांशिवाय काम मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्‍यामुळे महापालिकेच्या आवाहनाकडे बहुतांश नागरिकांनी पाठ फिरवली आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याऐवजी आता महापालिका आयुक्‍तांनी अशा मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन महावितरणला हाताशी धरत वीज कापण्याचा निर्णय घेतल्याने असंतोष व्यक्‍त केला जात आहे. शहरातील अनेक अतिक्रमणे महापालिकेने उद्‌ध्वस्त केल्याने सध्या एजंटांनी मालमत्ताधारकांभोवती कोंडावळा केला असून, मालमत्ता अधिकृत करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. यासाठी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरले जात असल्याची चर्चा आहे.

तो अधिकारी पुन्हा वादात...
सध्या कन्‍नडहून बदलून आलेला एक वादग्रस्त अधिकारी उपायुक्‍त म्‍हणून रूजू झाला असून, यापूर्वी महापालिकेत कार्यरत असताना लोकप्रतिनिधींनी या अधिकाऱ्यावर रेड्डी कंपनीला पाठिशी घातल्याचा आरोप केला होता. पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने कचऱ्यात दगड-माती टाकून वजन वाढवत आर्थिक लूट केल्याचे त्‍यावेळी समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी या तत्‍कालिन घनकचरा विभागप्रमुखावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्‍हणजे, त्‍यावेळी गंभीर आरोप होऊनही पुन्हा या अधिकाऱ्याकडे घनकचरा विभागाचीच जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या या अधिकाऱ्याची चमकोगिरी सुरू असून, चर्चेत येण्यासाठी तोंडदेखल्या कारवाया करून बातम्‍या छापून घेत आपण कसे कर्तव्यदक्ष आहोत, हे दाखविण्याचा हा अधिकारी आटोकाट प्रयत्‍न करत असतो. मात्र यातून समस्या जैसे थेच दिसून येते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software