सिल्लोड, सोयगाव, पैठण तालुक्‍यात आभाळ फाटले!; हजारो हेक्‍टर जमिनी खरडल्या गेल्या, पिकांचे ८० ते १०० टक्‍के नुकसान

On

सिल्लोड/सोयगाव/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड, कन्‍नड आणि पैठण तालुक्यात सोमवारी (१५ सप्‍टेंबर) आभाळ फाटले. नद्या, नाल्यांना मोठा पूर आला. नद्यांनी पात्र ओलांडल्याने शेतांत पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठची गावे जलमय झाली. हजारो हेक्‍टर जमिनी खरडून गेल्या आहेत. आज, १६ सप्‍टेंबरपासून पिकांच्या नुकसानीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोमवारी दिवसभरात १७.८ मि. मी. पाऊस झाला. पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. सातारा, देवळाई, शिवाजी भागातील वीज गायब झाली होती. सखल भागांत पाणी शिरून नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. रस्‍त्‍यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते.

-सिल्लोड : चारणा नदीने पात्र ओलांडल्याने आमठाणा येथे नदी काठावरील २० लोक पाण्यात अडकले. त्‍यांनी घरावर आश्रय घेतला. त्‍यांची सुटका करण्यासाठी अग्‍निशमन दलाला पाचारण करावे लागले. मात्र ते येण्याआधीच पाणी ओसरल्याने ग्रामस्थांनीच या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्‍यांच्या संसारउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी ८ पासून दुपारी २ पर्यंत ते अडकून पडले होते. देऊळगाव बाजार येथे अग्‍निशमन दलाच्या पथकाने पुरात अडकलेल्या नदीकाठच्या ५ दुकानदारांना वाचवले. याशिवाय घाटनांद्रा, धारला, चारनेरवाडी, पेंडगाव, धावडा, चिंचवण, आमठाणा, देऊळगाव बाजार या गावांचा संपर्क तुटला. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प या पावसामुळे तुडूंब भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

-पैठण : वरूडी गावात ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पिकांचे ८० ते १०० टक्‍के नुकसान झाले आहे. सध्या जायकवाडी धरणातून १८ दरवाजे साडेतीन फूट उंच उघडून ६६ हजार ९२६ क्‍युसेक वगाने गोदापात्रात पाणी सोडले जात आहे. पैठणच्या जायकवाडी, पिंपळवाडी, राहुलनगरात अनेक घरांत पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे.

-सोयगाव : सोयगाव व परिसरातील नद्या-नाल्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांत व शेतांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. जरंडी, बनोटी मंडळात अतिवृष्टी झाली. पुलावरून पाणी वाहू लागल्याने सोयगाव- बनोटी रस्ता बंद झाला. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्‍या. सातगाव येथे नदीकाठच्या घरांत पाणी शिरून भांडी, अन्नधान्य वाहून गेले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software