अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर

On

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ट्रकने कारला मागून जोरात धडक दिली. यात कारमधील महिलेचा जागीच मृत्‍यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर फर्दापूरजवळ अजिंठा घाटातील टी पॉइंटवर सोमवारी (१५ सप्‍टेंबर) रात्री साडेआठला घडली.

मिताली सुहास पाटील (वय ६०, रा. जळगाव) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुहास राजाराम पाटील (वय ६५) व चालक योगेश नारायण ओसवाल (वय ४९, दोघे रा. जळगाव) गंभीर जखमी आहेत. पाटील दाम्‍पत्‍य कारने (क्र. एमएच ०३, एडब्ल्यू २२६१) सोमवारी जळगावला जात होते. त्‍याचवेळी जालना येथून लोखंडी सळई घेऊन ट्रक (क्र. एमएच २१, बीएन ४९१६) जळगावला जात होता. भरधाव ट्रकने कारला मागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार पूर्णपणे ट्रकखाली दबली गेली. नागरिकांनी धावून पाटील दाम्‍पत्‍य आणि चालक योगेश यांना कारबाहेर काढत सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र मिताली यांना डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. ट्रकखाली दबलेली कार क्रेनच्या साहाय्याने काढावी लागली. अपघातामुळे दोन तास वाहतूक खोळंबली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!

Latest News

अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!! अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले!; रात्री ८ ला तक्रार घेऊन आली, पहाटे तीनला पोलिसांनी केला गुन्हा दाखल!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर ४५ वर्षीय व्यक्‍तीने अश्लील कृत्‍य करत दोन तास दुचाकीवरून...
Career News : स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेण्याचा प्लॅन करताय? हे विद्यापीठ देत आहे लाखो रुपयांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या कोणत्या अटी आहेत...
Success Story : आयआयटीमध्ये टॉपर अन्‌ यूपीएससीमध्ये पहिला क्रमांक; आयएएस कनिष्क कटारियाला प्रत्येक पावलावर यश कसे मिळाले?
आदल्या रात्री किरकोळ वाद, दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चाकूचे सपासप वार, रेल्‍वेस्टेशन परिसरातील थरार
अजिंठा घाटात ट्रकची कारला मागून धडक, महिलेचा मृत्‍यू, दोघे गंभीर
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software