आरशाची फुटलेली काच मारून पत्नीने पतीला केले जखमी!, वाळूजची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विभक्‍त राहणाऱ्या पत्नीने पतीला आरशाची फुटलेली काच मारली. यात पती जखमी झाला. ही घटना वाळूजमध्ये शनिवारी (२९ नोव्‍हेंबर) रात्री साडेनऊला घडली.

वाळूजमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय युवकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहतो. खासगी नोकरी करतो. एक वर्षापासून त्याची पत्नी दोन मुलींना घेऊन वाळूजमध्येच विभक्त राहते. शनिवारी रात्री साडेनऊला युवक पत्नीकडे गेला आणि तिला तू माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास का गेली, असे विचारले. त्यावरून संतप्त होऊन पत्नीने शिवीगाळ करून त्याला धक्का दिला. त्यामुळे घरातील कपाटाच्या आरशाची काच फुटली. तीच काच घेऊन पत्नीने युवकाच्या उजव्या हातावर मारली. यात युवकाला दुखापत झाली. त्यानंतर युवकाने वाळूज पोलीस ठाण्यात येऊन पत्नीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव शेळके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software