‘थर्टीफर्स्ट’ची मस्ती, गच्चीवर तलवार घेऊन नाचत होता, पोलिसांनी मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबले!, छावणीतील लक्ष्मी कॉलनीत कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘थर्टीफर्स्ट’ची मस्ती अंगात भिनल्याने २५ वर्षीय तरुणाने चक्क गच्चीवर तलवार घेऊन नाचायला सुरुवात केली. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी तिथे जाऊन त्याला पकडले. त्याची मानगूट पकडून लॉकअपमध्ये डांबले. ही कारवाई छावणीतील लक्ष्मी कॉलनीत बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार महाशंख दांडगे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. बुधवारी रात्री ते पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे, पोलीस अंमलदार पायघन, देशमुख यांच्यासह गस्तीवर होते. लक्ष्मी कॉलनीत आले असता बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक जण हंसराज चंडालीया यांच्या गच्चीवर तलवार घेऊन नाचत आहे. पोलिसांनी लगेचच तिथे धाव घेतली आणि तलवार घेऊन नाचणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव शुभम संजय कोदली (वय २५, रा. भीमनगर भावसिंगपुरा) असे समोर आले. त्याच्याकडील तलवारही जप्त केली. त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शकील शेख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software