बंदूक, चाकू घेऊनच असतात ड्रग्ज तस्कर, थोडी गडबड केली की खेळ खल्लास!; सिटी चौक पोलिसांच्या कारवाईतून धक्कादायक प्रकार आला समोर!!, फाजलपुऱ्यात ३ तस्करांच्या मुसक्या आवळल्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ड्रग्ज तस्कर इतके निर्ढावले आहे, की आता शस्‍त्रे घेऊनच मोहिमेवर निघतात. थोडा धोका जाणवला तरी चाकू खुपसायला अन्‌ बंदुकीतून गोळी झाडायला कमी करणार नाहीत, असे भयावह चित्र आज, १३ नोव्‍हेंबरला पहाटे साडेबाराच्या सुमारास फाजलपुऱ्यात दिसून आले. सिटी चौक पोलिसांच्या पथकाने चांदणे चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील मेट्रो हॉटेलमध्ये धडक देत ३ ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून बंदूक, काडतुसे, चाकू आणि कफ सिरपच्या १७ बाटल्या जप्त केल्या आहेत.

इरफान उर्फ दानिश अयुब खान (वय २४, रा. बायजीपुरा), शेख शाहरुख शेख इरफान (वय २८, रा. यासिननगर, हर्सूल), शेख एजाज ईब्राहिम (वय ३५, रा. नारेगाव) अशी पकडण्यात आलेल्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांना बुधवारी (१२ नोव्हेंबर) त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीत फाजलपुरा भागात दोघे जण कफ सिरफच्या बाटल्या विकण्यासाठी येत आहेत. विठ्ठल शिंदे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सहायक फौजदार पठाण, बहुरे, शाहेद, टेकले, जाधव, गायकवाड, निरलवाड यांचे पथक छापा मारण्यासाठी रवाना झाले.

आज, १३ नोव्हेंबरला पहाटे साडेबाराच्या सुमारास पथक फाजलपुऱ्यात चांदणे चौकाकडे जाणाऱ्या रोडवरील मेट्रो हॉटेलसमोर आले. गुप्त बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे पथक हॉटेलमध्ये गेले असता काऊंटरवर शेख नदीम बसलेला होता. हॉटेल मेट्रोचा तो चालक असल्याचे समोर आले. पोलीस हॉटेलच्या आत गेले असता उत्तर बाजूला बाकड्यावर तिघे बसलेले होते. त्यातील एकाचे नाव इरफान खान असल्याचे त्याने सांगितले. त्याची झडती घेतली असता कमरेला एक गावठी पिस्तुल, पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे, एक खाली काडतूस मिळून आले. दुसऱ्याचे नाव शेख शाहरुख होते. तिसऱ्याचे नाव शेख एजाज होते. शेख एजाजकडे पँटच्या खिशात दोन कफ सिरपच्या बॉटल्या मिळून आल्या.

त्यास अधिक विचारणा केली असता, त्याने सांगितले की, मी व शेख शाहरुखने सदरचे कफ सिरप विक्रीकरिता आणले होते. दोन सॅम्पल बॉटल खिशात असून बाकी गाडीच्या डिक्कीत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी मोपेडची (MH 20 FV 1743) डिक्की तपासली असता त्यात १४ सिलबंद व १ रिकामी कफसिरफची बाटली मिळून आली. डिक्कीत दोन मोठे चाकूही मिळून आले. मोपेड, बंदूक, दोन चाकू आणि कफसिरपच्या बाटल्या असा एकूण २३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कफ सिरपच्या बॉटल कोठून आणल्या, असे पोलिसांनी शेख एजाजला विचारले असता, त्याने सांगितले की, या बॉटल चांदमारी, पडेगाव येथील फेराज (लंगडा) या व्यक्तीकडून खरेदी केल्या आहेत. मी व शेख शाहरुख असे मिळून ५०० रुपये प्रति बॉटल फेरोज लंगडा याच्याकडून खरेदी करून १ हजार रुपये प्रति बॉटल विक्री करतो. या बॉटल आम्ही ईरफान उर्फ दानिश अयुब खान याला विक्री करण्याकरिता आलो होतो, असे सांगीतले. पोलिसांनी ईरफान खान, शेख शाहरुख, शेख एजाज यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software