जिल्हा प्रशासनाने घेतला नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी आढावा, आचारसंहितेची अंमलबजावणी होणार कडक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून याबबत करावयाच्या विविध उपाययोजना व कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) आढावा बैठक घेण्यात आली. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, लतिफ पठाण, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त  ऋषिकेश भालेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात निवडणुकांसाठी आवश्यक सज्जता करावी. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीसंदर्भात द्यावयाचे सहाय्य देण्यात येईलच. तथापि स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत अधिक दक्षतेने काम करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले, की स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा कृती आराखडा तयार ठेवावा. तसे प्रस्ताव पाठवावे. मद्य व पैसे यांच्या अवैध वाहतुकीवर निगराणी ठेवावी. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवून संवेदनशील विषयांबाबत वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software