ड्रग्‍ज तस्करीविरुद्ध शहर पोलिसांचे मोठे पाऊल : तेजाच्या कुटुंबासह साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज (वय २७, रा. किलेअर्क) याची दहशत समूळ नष्ट करण्याचा चंग पोलिसांनी बांधल्याचे दिसून येते. आता त्याच्यासह त्याचे दोन मित्र, आई व मेव्हण्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी (५ सप्टेंबर) याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

तेजाविरुद्ध २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने ११ ऑगस्ट रोजी घरातच मैत्रीण राखी मुरमुरेवर गोळी झाडली होती. १२ ऑगस्टला पोलिसांनी त्याला घटनास्थळी पंचनाम्यासाठी नेले तेव्हा आणखी ४ मुलींना मारेन, असे मस्तवालपणे पोलिसांना म्हणाला होता. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍याला यथेच्छ प्रसाद देत शहरातून टक्कल करत धिंड काढली होती. आता तेजा, त्याची आई रेश्मा बेगम सय्यद एजाजोद्दीन (वय ४५), मेव्हणा अदनान शेख ऊर्फ सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे बब्बू शेख (वय २६, रा. बायजीपुरा), साथीदार शेख कलीम शेख सलीम (वय ३४), तालेब चाऊस यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. तेजाचे कुटुंब ड्रग्ज तस्करीत लिप्त आहे. वारंवार कारवाया करूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. यामुळे ड्रग्‍ज माफिया, तस्करांमध्ये कारवाईची दहशत निर्माण होण्यास मदत होणार आहे. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी ही कारवाई केली.

ये तेजा तेजा क्‍या है…
तेजा प्रारंभीच्या काळात भुरट्या चोऱ्या करायचा. नंतर काही अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि गंभीर गुन्हेगारीकडे वळला. पुंडलिकनगर, गारखेडा, सातारा येथील गुन्हेगार त्‍याचे निकटवर्तीय आहेत. सिडको पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्‍याच्याविरुद्ध त्याच्याच प्रेयसीने तक्रार दिली होती. अर्थात तीही गुन्हेगारच असून, तिच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याला जामीन मिळाला आहे. बलात्कार, खुनाचा प्रयत्न, शस्त्रसाठा, मारहाण आणि अमली पदार्थ विक्रीचे २० हून अधिक गंभीर गुन्हे त्‍याच्याविरुद्ध २०१८ ते २०२५ या काळात दाखल आहेत. अंमली पदार्थांची विक्री करणे हा त्‍याचा फॅमिली बिझनेस आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ

Latest News

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!
Jyotish : लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दलची ही मोठी रहस्ये उघड करते, तुमच्या रेषेचे रहस्य जाणून घ्या...
अभिनेता मनोज वाजपेयी यांची विशेष मुलाखत : चांगल्या कलाकारांचे कौतुक होणे महत्वाचे!; रामगोपाल वर्मांमध्ये आजही तीच आग, तीच आवड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software