संशयावरून वाळूज MIDC तील ओॲसिस चौकात पोलिसांनी ट्रक पकडला, समोर आला मोठाच घोळ!!

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलीस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पुण्याहून भंगार जालन्याला नेणारा ट्रक वाळूज एमआयडीसीतील ओॲसिस चौकात पोलिसांनी पकडला. या भंगाराची कागदपत्रे नसल्याने ते चोरीचे असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी ट्रक आणि भंगार (एकूण किंमत ७ लाख १२ हजार रुपये) जप्त केले. ही कारवाई गुरुवारी (४ सप्‍टेंबर) पहाटे एकला करण्यात आली.

भिमराव उत्तमराव चेपटे (वय ४९, रा. तातेवाडी ता.जि. जालना) असे संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज यांच्या पथकात पोलीस अंमलदार संदीप तागड, पैठणकर, भदर्गे, ठोके, पठारे आहेत. हे पथक गस्त घालत असताना  अबुज यांना गुप्त बातमीदारामार्फत कळले, की एक टाटा ट्रक संशयित भंगार घेऊन जात आहे. पथक लगेचच ओआयसीसी चौकात सापळा लावून थांबले. गुरुवारी (४ सप्‍टेंबर) पहाटे एकला संशयित ट्रक (एमएच १२ केपी ९६९५) येताना दिसला. पोलिसांनी ट्रक चालकाला हात देऊन थांबायला सांगितले. चालकाने ट्रक थांबवला. पोलीस उपनिरीक्षक अबुज यांनी चालकाला ट्रकमध्ये असलेल्या भंगार मालासंदर्भात चौकशी केली.

त्याने लोखंडी भंगारासंदर्भात कोणतीही कागदपत्र नसल्याचे सांगितले. भंगार कोठे खरेदी केले, कोठे विक्री करणार आहे याबाबत चौकशी केली असता त्याने लोखंडी भंगार साहित्य पुणे येथून घेत जालना येथे जात असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ट्रकचीही कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी ५ लाखांचा ट्रक, २ लाख १२ हजार रुपयांचे ७ हजार ७० किलो लोखंडी भंगार जप्त केले. ट्रकचालक भिमराव चेपटे याने भंगार साहित्य पुणे येथून कोठून तरी चोरून किंवा लबाडीने आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्‍याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार संदीप तागड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ

Latest News

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!
Jyotish : लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दलची ही मोठी रहस्ये उघड करते, तुमच्या रेषेचे रहस्य जाणून घ्या...
अभिनेता मनोज वाजपेयी यांची विशेष मुलाखत : चांगल्या कलाकारांचे कौतुक होणे महत्वाचे!; रामगोपाल वर्मांमध्ये आजही तीच आग, तीच आवड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software