गंगापूरजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक, वृद्धाचा मृत्‍यू, ३ जखमी

On

गंगापूर (गणेश म्‍हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दोन दुचाकींची धडक होऊन एका दुचाकीवरील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्‍यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शनिवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी साडेचारला गंगापूर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल विराज गार्डनसमोर घडली. पोपट रायभान थोरे (वय ७०, रा. नवाबपूर, ता. गंगापूर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. 

पोपट थोरे हे अख्तर सरदार पटेल (वय ५५, रा. गंगापूर) यांच्यासोबत मोटारसायकलीने (क्र. एमएच २० एझेड १५६९) भोयगावकडे मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्याचवेळी प्रविण शोभाराम दुडवे (वय २०) व आसाराम बर्डे (वय २०) हे तरुण मध्यप्रदेश येथील परप्रांतीय मजूर असून सध्या भेंडाळा येथे राहतात. ते मोटारसायकलीने (क्र. एमपी ४६ झेडएफ ४१९६) गंगापूरकडे येत होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

जखमींना शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ. हर्षल धाबे यांनी तपासून पोपट थोरे यांना मृत घोषित केले. अख्तर पटेल यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. प्रविण दुडवे आणि आसाराम बर्डे यांच्यावर गंगापूरमध्येच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद गंगापूर पोलिसांनी घेतली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर थोरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ

Latest News

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!
Jyotish : लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दलची ही मोठी रहस्ये उघड करते, तुमच्या रेषेचे रहस्य जाणून घ्या...
अभिनेता मनोज वाजपेयी यांची विशेष मुलाखत : चांगल्या कलाकारांचे कौतुक होणे महत्वाचे!; रामगोपाल वर्मांमध्ये आजही तीच आग, तीच आवड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software