सुसाट कारने स्कुटीस्वार शिक्षिकेला उडवले, सेंट्रल नाका चौकातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने स्कुटीस्वार शिक्षिकेला धडक दिली. यात शिक्षिका जखमी झाली असून, त्‍यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सेंट्रल नाका चौकात घडली. शुक्रवारी (५ सप्‍टेंबर) जिन्सी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षिका यास्मीन बेगम शेख नवाज (वय ३६,  रा. रोजाबाग लकी आइस्क्रीम सेंटरमागे जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या पती सय्यद इम्रान रजवी मुस्ता अजरुद्दीन यांच्यासह राहतात. मोहम्मदीया हायस्कूल गारखेडा येथे शिक्षिका आहेत. शाळेचे काम आटोपून इलेक्ट्रीक ओला स्कुटीवर बसून गारखेड्याकडून रोजाबागकडे जात होत्या.

सेंट्रलनाका चौकात रोशनगेटकडून येणाऱ्या कारने (MH 20 EJ 8298) त्यांना धडक दिली. त्यामुळे त्या गाडीसह पडल्या व जखमी झाल्या. चौकातील लोकांनी व कार चालकाने जवळच असलेल्या अमान हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी उजव्या पायाचा एक्सरे काढला असता गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाल्याचे त्यांनी सांगितले. अमान हॉस्पिटलमध्ये आयसीयूची सुविधा नसल्याने त्यांना पुढील उपचार कामी एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिक तपास पोलीस अंमलदार गजानन मांटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ

Latest News

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!
Jyotish : लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दलची ही मोठी रहस्ये उघड करते, तुमच्या रेषेचे रहस्य जाणून घ्या...
अभिनेता मनोज वाजपेयी यांची विशेष मुलाखत : चांगल्या कलाकारांचे कौतुक होणे महत्वाचे!; रामगोपाल वर्मांमध्ये आजही तीच आग, तीच आवड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software