लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!

On

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लाडसावंगी ते चौका आणि लाडसावंगी ते भाकरवाडी रस्त्यावर मुरुमऐवजी माती टाकून रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ठेकेदार कंपनीच्या या मनमानीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचाही अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

रस्‍त्‍यासाठी खोदकाम केल्यानंतर मुरूम टाकून दबाई करणे आवश्यक आहे. मात्र मुरमा ऐवजी काळी माती वापरली जात असल्याने रस्ता लवकरच उखडला जाईल, असे चित्र आहे. शेंद्रा एमआयडीसीला जोडण्यासाठी चौका ते लाडसावंगी व करमाड ते लाडसावंगी व भाकरवाडी या रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चौका ते लाडसावंगी व लाडसावंगी ते भाकरवाडी या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे तर करमाड ते लाडसावंगी या रस्त्याचे अद्याप काम सुरू झाले नाही. शिवाय लाडसावंगी व भाकरवाडी रस्त्यावर मुरूमऐवजी काळी माती वापरली जात आहे. यात या रस्त्याच्या कामाची देखभालही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र या कामावर संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने दोनशे कोटी रुपयांचा निधी वाया जाणार तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ

Latest News

धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ धक्कादायक : सरपंच महिलेच्या तोंडात चापट मारली, नंतर हिला मधी घ्या म्हणत चढवला हल्ला!; खुलताबाद तालुक्‍यातील पाडळीच्या घटनेने खळबळ
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्‍महत्‍या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन्‌ सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
लाडसावंगी ते चौका अन्‌ लाडसावंगी ते भाकरवाडी रस्‍ता करताना ठेकेदाराची मनमानी!; मुरूमऐवजी मातीचा भराव, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!!
Jyotish : लग्न रेषा तुमच्या लग्नाबद्दलची ही मोठी रहस्ये उघड करते, तुमच्या रेषेचे रहस्य जाणून घ्या...
अभिनेता मनोज वाजपेयी यांची विशेष मुलाखत : चांगल्या कलाकारांचे कौतुक होणे महत्वाचे!; रामगोपाल वर्मांमध्ये आजही तीच आग, तीच आवड!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software