करिअर अकॅडमीच्या मुलांनी शेतकऱ्याला बदडले!; कारण अन्‌ भाषा ऐकून म्हणाल, हे काय देशाचं भविष्य बनणार?

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खडकी डोंगराजवळ एका शेतकऱ्याच्या शेतात मराठवाडा करिअर अकॅडमीच्या मुलांनी चांगलीच आगळीक केली. माझ्या शेतात कशाला आलात, अशी विचारणा शेतकऱ्याने करताच शिवीगाळ करून शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली. त्‍याचे डोके फोडले. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तीन-चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी विनोद धनराज डोंगरे (वय ३५, रा. तारकस गल्ली बेगमपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. गुरुवारी (२१ ऑगस्ट) सकाळी साडेसातला ते त्‍यांच्या खडकी डोंगराजवळील शेतात आले. अनोळखी तीन ते चार तरुण शेताच्या बाजूला धावत होते. ते धावत येऊन डोंगरे यांच्या शेतात उभे राहिले. डोंगरे यांनी त्यांना तुम्ही कोण आहात, काय पाहिजे...

त्यावर त्यांनी सांगितले, की आम्ही मराठवाडा करिअर अकॅडमीची मुले आहोत. येथेच काय कुठेही धावू. ही जमीन तुमच्या बापाची आहे का? त्यावर डोंगरे यांनी त्यांना सांगितले, की माझा बाप काढू नका. शेती माझीच आहे. त्यावर त्या मुलांनी डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोंगरे खाली पडले. एका मुलाने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने डोके फुटले. ती मुले शिवीगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक

Latest News

त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतून ५ आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ अशा ६ दुचाकी त्रिकुटाने चोरी केल्या...
रस्ता रूंदीकरणाविरुद्ध विनोद पाटील आक्रमक, मनपा आयुक्‍तांच्या बंगल्यावर धडक, मालमत्ताधारकांची जोरदार घोषणाबाजी
छ. संभाजीनगर ३ तरुणांची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, सिल्लोड, गंगापूर, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
प्रा. जोगेंद्र कवाडे छ. संभाजीनगरात; म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देणे, मंत्र्यांनीच वराह पूजन करणे असंवैधानिक!, ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण द्या!!
वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर दुर्घटना : ट्रकला मागून दुसरा ट्रक धडकला, खामगावच्या चालकाचा मृत्‍यू, शेगावचा क्‍लिनर जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software