- Marathi News
- सिटी क्राईम
- चिकलठाण्यात भीषण अपघात : दुचाकीने निघालेल्या चौघांना उडवून काळी कार पसार!; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू...
चिकलठाण्यात भीषण अपघात : दुचाकीने निघालेल्या चौघांना उडवून काळी कार पसार!; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एकाच दुचाकीवरून निघालेल्या चौघांना सुसाट कारने धडक दिली. दुचाकी चालवणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर त्याचे ३ मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना केंब्रिज ते चिकलठाणा रस्त्यावरील हिनानगरात सोमवारी (२५ ऑगस्ट) पहाटे अडीचला घडली.
बिडकीनजवळ दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर- पैठण रोडवरील ताहेरपूर येथे अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार रामदास बाजीराव वाघ (वय ४०, रा. पाटेगाव, ता. पैठण) यांना उडवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११ च्या सुमारास घडली. रामदास वाघ हे डोंबाऱ्याचा खेळ व फूल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. कामानिमित्त सोमवारी सकाळी दुचाकीने (एमएच २० सीएन २४५१) पैठणला जात होते. बिडकीनजवळील ताहेरपूर येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली आणि वाहन पसार झाले. त्यांना पोलिसांनी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे. घटनेची नोंद बिडकीन पोलिसांनी घेतली आहे.