लाचखोराने लाज सोडली... निराधार योजनेच्या लाभासाठी विधवेला २ हजार रुपये मागणारा दलाल किशोर जाधव ACB च्या जाळ्यात!

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : संजय गांधी निराधार योजनेची फाईल मंजूर करून देतो, असे सांगत विधवेला दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दलाल किशोर गोरख जाधव (रा. सुलीभंजन) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) सोमवारी (२५ ऑगस्ट) खुलताबाद तहसील कार्यालय पकडले. तो आता कुणासाठी पैसे घेत होता, हे समोर येणे आवश्यक आहे.

किशोरने विधवेची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. विधवेने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. पथकाने खुलताबाद तहसील कार्यालयात सापळा रचला. मात्र किशोरला संशय आला. त्याने पैसे स्वीकारले नाही. त्यानंतर दुपारी चारला तो विधवेची फाईल घेऊन जात असताना एसीबीच्या पथकाने त्‍याला ताब्यात घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना

Latest News

गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना गणपतीचं डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्‍यू, पैठणची दुर्दैवी घटना
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : गणपती प्रतिष्ठापनेसाठी डेकोरेशन करताना १८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण...
पालकमंत्र्यांचे सूतोवाच : महापालिका निवडणूक १५ डिसेंबरच्या आसपास!
चालकाला फिट आल्याने नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर!, सेव्हन हीलजवळील घटना
त्रिकुटाने चोरलेल्या ६ दुचाकी वाळूज MIDC पोलिसांनी केल्या जप्त, दोघांना अटक
रस्ता रूंदीकरणाविरुद्ध विनोद पाटील आक्रमक, मनपा आयुक्‍तांच्या बंगल्यावर धडक, मालमत्ताधारकांची जोरदार घोषणाबाजी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software