मोठी बातमी : व्यापारी महिलेला अडवून बेदम मारहाण, चाकूहल्ला करत लुटले, पावणेतीन लाखासह स्कुटीही घेऊन पसार, वर्दळीच्या कटकट गेटवरील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडी मोंढ्यातील दायमा सुपर मार्केटच्या मालकिनीला कटकट गेट रोडवरील केके पेट्रोपंपाजवळ ३ तरुणांनी सिनेस्‍टाइल लुटले. बेदम मारहाण करत चाकूने वार करून त्यांच्याकडील स्कुटी घेऊन दोघे पसार झाले. स्कुटीच्या डिक्कीत पावणेतीन लाख रुपये होते. त्यांचा तिसरा साथीदार लोकांनी पकडला आणि जिन्सी पोलिसांच्या ताब्यात दिला. मंगळवारी (२५ नोव्‍हेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा थरार घडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शीतल नंदकिशोर दायमा (वय ५०, रा. बालाजीनगर, बालाजी मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. जाधववाडी मोंढा येथे त्या त्यांचे काका हरिशंकर दायमा (वय ६७) यांच्या नावे असलेले दायमा सुपर मार्केट चार वर्षांपासून चालवतात. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दायमा सुपर मार्केट उघडून त्या व कॅशियर सुयोग सुनिल चेलाह व ६ पुरुष, ६ महिला असे एकूण १२ हेल्पर मिळून सुपरमार्केटचा दिवसभर धंदा केला. आलेल्या रकमेचा शीतल दायमा आणि कॅशियर सुयोगने हिशोब केला. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी दुकान बंद करून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्लास्टिकच्या कॅरिबॅग ठेवले आणि ते ॲक्टिवा स्कुटीच्या (MH25AB8596) डिक्कीत ठेवून शीतल दायमा या  कॅशियर सुयोगसोबत मोंढा, आंबेडकर चौकातून टीव्हीसेंटर चौक येथे आल्या.

सुयोगला टीव्हीसेंटर चौकात सोडून त्या ॲक्टिवा स्कुटीने कटकटगेटमार्गे पानदरीबा येथे निघाल्या. रात्री पावणेदहाच्या सुमारास केके पेट्रोपंपाजवळील इंपेरिअर लॉन्स समोरून कटकटगेट रोडने त्या जात होत्या. दुभाजकाला लागून गाडी चालवत असताना त्यांच्या मागून प्लॅटीना गाडीवर तोंड बांधून नंबरप्लेटवर काळा कपडा टाकून तिघे अचानक समोर आले. गाडीसमोर गाडी लावून त्यांनी शीतल दायमा यांना थांबवले. शीतल दायम यांनी त्यांना माझी गाडी का थांबवली, अशी विचारणा केली असता गाडी चालवणाऱ्याने त्यांना धक्का दिला. ॲक्टिवाची चावी काढून घेतली. नंतर शीतल यांना दुभाजकावर ढकलून देत तिघांनी लाथाबुक्क्यांनी, हाताचापटाने मारहाण सुरू केली.

त्यांच्या हातातील चाकूने उजव्या कानाच्यावर डोक्यावर मारून जखमी केले. नंतर तिघांपैकी दोघे शीतल दायमा यांची स्कुटी घेऊन पळून गेले. लुटारूंची स्कुटी घेऊन तिसरा साथीदार निघत असताना शीतल दायमा यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी व शीतल यांनी मिळून तिसऱ्या हल्लेखोराला पकडून ठेवले. त्याचवेळी कोणीतरी पोलिसांना कॉल करून बोलावून घेतले. पोलिसांची तातडीने घटनास्थळी येत लुटारूला गाडीत बसवले आणि त्याची प्लॅटिना स्कुटी (MH20GD1522) सुद्धा जिन्सी पोलीस ठाण्यात आणली.

त्या लुटारूचे नाव विचारले असता त्याने यश परविन डमाळे (वय २०, रा. मयूर पार्क देवगिरी बँकेमागे, छत्रपतीसंभाजीनगर) असे सांगितले. त्याच्यासोबत असणाऱ्यांची नावेही समोर आली. इरफान पटेल (वय २२, रा. किराडपुरा) व निवांत गोखले (वय ३०, रा. चिंचेच्या झाडाजवळ, शहाबाजार) अशी त्यांची नावे असल्याचे यशने पोलिसांना सांगितले. शीतल दायमा या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिन्सी पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुणा घुले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software