जुन्या भांडणातून  बारक्याने शिकवला मोठा धडा!‌; चिकलठाण्यातील हिनानगरात काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चिकलठाण्यातील हिनानगरात सोमवारी (२२ सप्‍टेंबर) पहाटे दीडला एकच हल्लकल्लोळ माजला. जुन्या भांडणातून एकाने तरुणाची दुचाकी जाळली होती. नागरिकांनी धावून आग विझवली. दुचाकी खाक झाली आहे.

सुमेध दिनकर ठोकळ (वय २५, रा. गल्ली नं. १३, हिनानगर चिकलठाणा) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो IDFC बँकेत फायनान्सचे काम करतो. त्याच्याकडे मोटासायकल (MH 20 GF 7665) आहे. गल्लीत राहणाऱ्या अनिल महेर उर्फ बारक्या याचा व सुमेधचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद आहे. रविवारी (२१ सप्‍टेंबर) सायंकाळी सातला सुमेधने मोटारसायकल गल्लीत पावसामुळे चिखल झाल्यामुळे घरापासून चार ते पाच घरे सोडून सिमेंट रोडवर हॅन्डल लॉक करून उभी केली होती.

सोमवारी (२२ सप्‍टेंबर) पहाटे दीडला (मध्यरात्री) शेजारी राहणाऱ्या शिंदे यांनी आवाज देऊन सुमेधला झोपेतून उठवले. त्यांनी सांगितले, की तुझी मोटारसायकल अनिल महेर उर्फ बारक्याने जाळून टाकली. तिचे समोरील लाईटचे काच फोडले आहे. त्याने त्या ठिकाणी विजेच्या तारा तोडल्या आहेत. त्यामुळे सुमेध व त्याच्या वडिलांनी लगेचच मोटारसायकलीकडे धाव घेतली. तोपर्यंत जमलेल्या लोकांनी मोटारसायकल विझवलेली होती. आगीत मोटारसायकलीचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अधिक तपास सिडको एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software